शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ अन् टापटीप गणवेशात आले १०६ विद्यार्थी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2018 23:32 IST

शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांना आंर्तबाह्य स्वच्छतेचे महत्त्व पटावे. त्याचप्रमाणे आपला परिसर स्वच्छ असल्यास मनही प्रसन्न राहते, याचे बाळकडू मिळावेत, यासाठी रयत शिक्षण संस्थेच्या अण्णासाहेब कल्याणी विद्यालयाने ‘स्वच्छ शाळा,

ठळक मुद्देअण्णासाहेब कल्याणी विद्यालय रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी वर्षानिमित्त स्वच्छ शाळा, सुंदर शाळा उपक्रम

सातारा : शालेय जीवनापासून विद्यार्थ्यांना आंर्तबाह्य स्वच्छतेचे महत्त्व पटावे. त्याचप्रमाणे आपला परिसर स्वच्छ असल्यास मनही प्रसन्न राहते, याचे बाळकडू मिळावेत, यासाठी रयत शिक्षण संस्थेच्या अण्णासाहेब कल्याणी विद्यालयाने ‘स्वच्छ शाळा, सुंदर शाळा’ हा उपक्रम आयोजित केला. पहिल्याच दिवशी सोमवारी पहिलीतील १०६ विद्यार्थी टापटीप गणवेशात वर्गात आले होते.

रयत शिक्षण संस्था यंदा शताब्दी वर्ष साजरा करत आहे. या पार्श्वभूमीवर अण्णासाहेब कल्याणी विद्यालयाने वर्षभर विविध विधायक कार्यक्रम राबविण्याचा संकल्प केला. या उपक्रमांमध्ये विद्यार्थी, पालकांचा सक्रिय सहभाग घेतला जात आहे.मुख्याध्यापक प्रमोद वायदंडे म्हणाले, ‘स्वच्छ शाळा, सुंदर शाळा या उपक्रमांमध्ये परिपूर्ण गणवेश, वर्ग सजावट, परिसर स्वच्छता, बागेची निगा राखणे यावर भर दिला जात आहे. यासाठी जून महिन्यापासूनच तयारी करण्यात आली. यासाठी वाक्यपट्ट्या, शब्दपट्ट्या तयार करण्यात आल्या. व्यसनामुळे आरोग्यावर होणारे परिणाम, होणार आजार याबाबत जनजागृती करणारे संदेश देण्यात आले.’

विद्यार्थ्यांमध्ये शिस्त लागावी, त्यांना वेळेचे महत्त्व पटावे यासाठी पालकसभा घेऊन जनजागृती करण्यात आली. रयत शिक्षण संस्थेत स्थापनेपासून आत्तापर्यंत झालेला बदल याची ध्वनीचित्रफीत दाखविली. पहिल्याच दिवशी सोमवार, दि. ८ रोजी पहिलीतील १०६ विद्यार्थी परिपूर्ण गणवेशात आली होती. त्यांचे टाळ्या वाजवून स्वागत केले. संस्थेचे जनरल बॉडी सदस्य प्रा. अजित पाटील, धैर्यशील पाटील यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांचे कौतुक केले. मुख्याध्यापक प्रमोद वायदंडे, पर्यवेक्षक संजय घाडगे, दीपक महापरळे, वर्गशिक्षिका वर्षा कांबळे यांनी मार्गदर्शन केले.गुणवंत विद्यार्थी घडविण्यासाठीगुणवंत विद्यार्थी घडविण्यासाठी विद्यालयाने आजवर अनेक उपक्रम राबविले आहेत. ही परंपरा यंदाही कायम ठेवण्यात येणार आहे. यामध्ये मुलांना लसीकरण, डिसेंबर-जानेवारी महिन्यात आरोग्य तपासणी, विद्यार्थ्यांना थेट बांधावर नेऊन शेतीविषयी माहिती देणे हे उपक्रम राबविले जात आहे. गेल्या वर्षी प्रदूषण मुक्त दिवाळी हा उपक्रम राबविला. तेव्हा फटाक्यातून पैसे वाचवून अनाथ मुलांना जीवनाश्यक वस्तू देण्यात आल्या होत्या. हाच उपक्रम यंदाही राबविला जाणार आहे. 

रयत शिक्षण संस्थेच्या शताब्दी निमित्ताने हा उपक्रम आयोजित केला असला तरी तो कायमस्वरूपी राबविण्यात येणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या भावी वाटचालीस फायदा होणार आहे.- प्रमोद वायदंडे, मुख्याध्यापक

साताऱ्यातील रयत शिक्षण संस्थेच्या अण्णासाहेब कल्याणी विद्यालयात स्वच्छ व सुंदर शाळा उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये सोमवारी पहिलीतील विद्यार्थी परिपूर्ण गणवेशात आले होते.

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाStudentविद्यार्थीSatara areaसातारा परिसर