शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
6
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
7
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
8
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
9
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
10
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
11
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
12
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
13
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
14
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
15
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
16
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
17
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
18
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
19
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
20
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी

जिल्ह्यामधील १०१ गावांनी कोरोनाला रोखले वेशीवरच! शिरकाव नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 13:29 IST

CoronaVirus Satara- सातारा जिल्ह्यात कोरोनाचा कहर दुसऱ्यांदा सुरू झाला आहे. पण, अजूनही जिल्ह्यातील काही गावांत कोरोनाचा शिरकावही झालेला नाही. जिल्ह्यातील १०१ गावांनी अजूनही कोरोनाला वेशीबाहेरच ठेवले आहे. तर जिल्ह्यातील १ हजार ३९१ गावांत कोरोना विषाणू पोहोचलाय. यामध्ये सर्वाधिक बाधित गावे ही सातारा, पाटण आणि कऱ्हाड या तालुक्यातच आहेत.

ठळक मुद्दे जिल्ह्यामधील १०१ गावांनी कोरोनाला रोखले वेशीवरच! शिरकाव नाही १३९१ गावांत पोहोचला; सर्वाधिक बाधित गावे सातारा, पाटण अन् कऱ्हाड तालुक्यातील

नितीन काळेलसातारा : जिल्ह्यात कोरोनाचा कहर दुसऱ्यांदा सुरू झाला आहे. पण, अजूनही जिल्ह्यातील काही गावांत कोरोनाचा शिरकावही झालेला नाही. जिल्ह्यातील १०१ गावांनी अजूनही कोरोनाला वेशीबाहेरच ठेवले आहे. तर जिल्ह्यातील १ हजार ३९१ गावांत कोरोना विषाणू पोहोचलाय. यामध्ये सर्वाधिक बाधित गावे ही सातारा, पाटण आणि कऱ्हाड या तालुक्यातच आहेत.जिल्ह्यात गेल्यावर्षी मार्च महिन्यापासून कोरोना विषाणूचा शिरकाव झाला आहे. जिल्ह्यात पहिला रुग्ण आढळून आला तो परदेशातून आलेला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने जिल्ह्यात कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत गेले. एप्रिल आणि मे महिन्यात स्थिती कमी होती. तसेच काही गावांत कोरोनाचा शिरकाव झाला होता. त्यातच लॉकडाऊन असल्याने जिल्ह्यातील गावांच्या सीमा बंद होत्या. अनोळखी व्यक्तींना प्रवेश नव्हताच. त्याचबरोबर चाकरमान्यांनाही गावात येताना शाळांमध्ये क्वारंटाईन व्हावे लागले. एवढ्या मोठ्या त्रासाला अनेकांना सामोरे जावे लागले. मात्र, जूननंतर काही प्रमाणात ढिलाई आली आणि कोरोना कहर सुरू झाला. तो सप्टेंबर महिन्यापर्यंत सुरू होता. तर ऑक्टोबर महिन्याच्या अखेरपर्यंत जिल्ह्यातील १ हजार २६४ गावांत कोरोना रुग्ण सापडले होते; तर २२८ गावे कोरोनापासून दूर होती. असे असले तरी. कोरोना आता जिल्ह्यातील सर्वच गावांत पोहोचणार की काय, असे वाटू लागले आहे.जिल्ह्यात कोरोना विषाणूची दुसरी लाट आली आहे. फेब्रुवारी महिन्यापासून बाधितांचे प्रमाण एकदमच वाढले आहे. मार्च महिन्यात तर हे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते. कारण, एकाच महिन्यात साडेसहा हजारांवर बाधित आढळले; तर ५१ जणांचा कोरोनाने बळी घेतला होता. एप्रिल सुरू झाल्यापासून तर दिवसाला ५००, ७०० च्या पटीत बाधित स्पष्ट होऊ लागले आहेत. त्यामुळे अवघ्या पाच दिवसांत दोन हजारांवर बाधित समोर आले. त्याचबरोबर अनेक गावांतही कोरोनाचा शिरकाव झाला.जिल्ह्यात १४९२ ग्रामपंचायती आहेत.

यामधील १ हजार ३९१ गावांत आतापर्यंत कोरोना पोहोचला आहे, तर १०१ गावांनी अजूनही कोरोनाला गावाबाहेरच ठेवले आहे. कोरोना वाढीचा वेग लक्षात घेता, येत्या काही दिवसांत नवीन काही गावांत कोरोना पोहोचू शकतो. पण, ग्रामस्थांनी कोरोना नियमांचे पालन, गावासाठी काही नियम लागू केले, तर अजूनही त्या-त्या गावापासून कोरोना दूर राहू शकतो. कोरोना कहर सुरू असताना अशा उपाययोजना आवश्यकच ठरल्या आहेत. तरच गावापासून कोरोनाला दूर ठेवता येऊ शकते. तर विशेष म्हणजे अनेक गावे ही दूर, दुर्गम भागात आहेत. त्याचबरोबर तेथील लोकसंख्याही कमी आहे. अशी अनेक गावे कोरोनापासून दूर आहेत.कोरोना रुग्ण आढळणारी तालुकानिहाय गावे...खंडाळा तालुका ६९, पाटण १९४, फलटण ११८, जावळी ११८, सातारा १९७, कऱ्हाड १८३, कोरेगाव १२८, खटाव १२६, माण ९६, वाई ११० आणि महाबळेश्वर तालुका ५२.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर