शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "उद्या रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
4
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
5
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
6
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
7
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
8
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
9
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
10
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
11
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
12
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
13
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
14
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
15
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
16
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
17
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
18
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
19
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
20
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
Daily Top 2Weekly Top 5

झेडपीचा कारभार विद्यमान पदाधिकाऱ्यांकडेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 17:25 IST

सांगली जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षांसह चार विषय समिती सभापती आणि दहा पंचायत समिती सभापतींना नवीन पदाधिकारी निवडीपर्यंत कारभार पाहण्याची संधी मिळणार आहे.

ठळक मुद्देझेडपीचा कारभार विद्यमान पदाधिकाऱ्यांकडेचनविन पदाधिकाऱ्यांवर अन्याय का, असा सवाल

सांगली : जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षांसह चार विषय समिती सभापती आणि दहा पंचायत समिती सभापतींना नवीन पदाधिकारी निवडीपर्यंत कारभार पाहण्याची संधी मिळणार आहे.

जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षांची निवड दि. २ जानेवारीला होणार असल्यामुळे विद्यमान पदाधिकाऱ्यांना बारा दिवस, तर पंचायत समिती सभापती, उपसभापतींच्या निवडी दि. ३० डिसेंबरला होणार असल्यामुळे विद्यमान सभापती, उपसभापतींना दहा दिवसांची जादा मुदतवाढ मिळणार आहे.जिल्हा परिषद विद्यमान पदाधिकाऱ्यांचा अडीच वर्षाचा कारभार दि. २३ आॅगस्ट २०१९ रोजी संपला होता. तरीही या पदाधिकाऱ्यांना विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे चार महिन्यांची मुदतवाढ मिळाली होती. ही मुदतवाढ दि. २० डिसेंबरपर्यंतच होती. दि. २१ डिसेंबरला नवीन जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षाची निवड होणे अपेक्षित होते. पण, जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पंचायत समिती सभापतीसाठी पुढील अडीच वर्षाचे आरक्षण सोडत वेळेत झाली नाही.

यामुळेच जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षासह दहा पंचायत समिती सभापती, उपसभापतींच्या निवडी वेळेत झाल्या नाहीत. यामुळेच जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षांना बारा दिवसांची, तर दहा पंचायत समिती सभापती, उपसभापतींना दहा दिवसांच्या मुदतवाढीची लॉटरी लागली आहे.

शासनाने दि. २३ आॅगस्ट २०१९ रोजी काढलेल्या परिपत्रानुसार पोटकलम (१) मध्ये काहीही अंतर्भूत असले तरी, जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष व त्यांच्या विषय समित्यांचे सभापती आणि पंचायत समिती सभापती, उपसभापतींचा वाढविलेला कालावधी समाप्त झाल्यानंतरही, जिल्हा परिषद अधिनियमान्वये नूतन पदाधिकारी निवडीपर्यंत तेच पदाधिकारी राहातील, असे स्पष्ट केले आहे.

शासनाने शुक्रवारी पदाधिकाऱ्यांचा कार्यकाल संपल्यानंतर काय करावे, याबाबतचा कोणताही आदेश पाठविला नाही. यामुळे विद्यमान पदाधिकारीच नूतन पदाधिकारी निवडीपर्यंत राहतील, हे निश्चित झाले आहे. नवीन पदाधिकाऱ्यांचा मात्र जवळपास सव्वाचार महिन्यांचा कालावधी कमी झाला आहे.

याबद्दल जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी इच्छुक असणाऱ्या सदस्यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. नविन पदाधिकाऱ्यांवर अन्याय का, असा सवालही उपस्थित होत आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदSangliसांगली