शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील जिल्हा परिषदेची नोकरभरती पुन्हा लांबणीवर, ऑनलाइन परीक्षा घेण्यासाठी खासगी कंपन्यांचा नकार

By अशोक डोंबाळे | Updated: February 14, 2023 14:16 IST

जिल्हा परिषद नोकरभरती घेण्याबाबत अभ्यास करण्यासाठी मंत्रालयस्तरावर ग्रामविकास विभागाच्या सचिवांसह अन्य विभागाकडील तीन अशा चार सचिवांची समिती गठित

सांगली : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यात ७५ हजार नोकरभरती करण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा करून आदेशही काढला होता. त्यानुसार राज्यातील जिल्हा परिषदेकडील १३ हजार ५२१ कर्मचाऱ्यांच्या भरतीचे अधिकाऱ्यांनी वेळापत्रकही जाहीर केले. पण, खासगी कंपन्यांनी ऑनलाइन परीक्षा घेण्यासाठी नकार दिल्यामुळे नोकरभरती पुन्हा लांबणीवर गेली आहे.जिल्हा परिषद अंतर्गत गट क वर्गाची नोकरभरती करण्यास राज्य सरकारने डिसेंबर २०२२ मध्ये हिरवा कंदील दाखवला होता. एकूण रिक्त जागांच्या ८० टक्के जागा भरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. वाहनचालक आणि गट ड वर्गातील पदे वगळून इतर पदे भरण्यास मंजुरी दिली होती. त्यानुसार राज्यातील जिल्हा परिषदेतील रिक्त पदांची भरतीप्रक्रिया चालू झाली होती. शासनाच्या आदेशानुसार सर्व जिल्हा परिषदांनी ३१ जानेवारी २०२३ पर्यंत बिंदू नामावली अंतिम केली आहे. १ ते ७ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत नोकरभरतीची जाहिरात प्रसिद्ध होणार होती. ८ ते २२ फेब्रुवारी २०२२ या कालावधीत उमेदवारांकडून अर्ज मागवून पात्र उमेदवारांची ऑनलाइन परीक्षा एप्रिल महिन्यात घ्यायची होती. पण, शासनाकडून अद्याप जिल्हा परिषद नोकरभरतीची जाहिरातच प्रसिद्ध झाली नाही. शासनाने जिल्हा परिषद नोकरभरतीचे प्रसिद्ध केलेल्या वेळापत्रकातील दीड महिन्याचा कालावधी संपला आहे. याबद्दल ग्रामविकास विभागाकडे विचारणा केल्यानंतर नोकरभरतीचा धोरणात्मक निर्णय झाला नाही. यामुळे भरती प्रक्रिया थांबली आहे. काही अधिकाऱ्यांनी खासगीत सांगितले की, ऑनलाइन परीक्षा घेण्यासाठी खासगी संस्था इच्छुक नाहीत. संबंधित कंपन्यांकडे एवढी मोठी यंत्रणा नसल्यामुळे नोकरभरती थांबली आहे.चार सचिवांची समितीजिल्हा परिषद नोकरभरती घेण्याबाबत अभ्यास करण्यासाठी मंत्रालयस्तरावर ग्रामविकास विभागाच्या सचिवांसह अन्य विभागाकडील तीन अशा चार सचिवांची समिती गठित केली आहे. ही समिती अभ्यास करून नोकरभरतीबद्दल ठोस धोरण निश्चित करणार आहे. त्यानंतरच जिल्हा परिषद नोकरभरतीचा निर्णय होणार आहे. पण, समिती गठित करूनही महिन्याचा कालावधी संपला असून तरीही निर्णय नसल्यामुळे तरुणांमध्ये नाराजीचा सूर आहे.

टॅग्स :Sangliसांगलीzpजिल्हा परिषद