मिरज : मिरजजवळील निलजी-बामणी रोडवरील पुलाजवळ ५०० रुपयांच्या बनावट नोटा बाजारात खपविण्याच्या उद्देशाने आलेल्या एका तरुणास पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून ४२ हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. सुप्रीत कडप्पा देसाई (वय २२, रा. इदरगुच्ची, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर) याच्याकडून खऱ्या नोटांसारख्या असलेल्या पाचशे रुपयांच्या ८४ बनावट नोटा पोलिसांनी ताब्यात घेतल्या. बुधवारी दुपारी दोन वाजता महात्मा गांधी चौक पोलिसांचे पथक गस्तीवर असताना ही कारवाई करण्यात आली. संशयित देसाई हा बनावट नोटा बाजारात खपविण्याच्या तयारीत असल्याचे समोर आले. याप्रकरणी पोलिस कर्मचारी राजेंद्र हारगे यांनी गांधी चौक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, संशयितावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.
Web Summary : A youth was arrested near Miraj with fake ₹500 notes intended for circulation. Police seized ₹42,000 worth of counterfeit currency from Supreet Desai, 22, during a patrol. He is now in custody facing charges.
Web Summary : मिरज के पास एक युवक को नकली ₹500 के नोटों के साथ गिरफ्तार किया गया, जो बाजार में चलाने की कोशिश कर रहा था। पुलिस ने सुप्रीत देसाई, 22, से ₹42,000 मूल्य की नकली मुद्रा जब्त की। वह अब हिरासत में है और उस पर आरोप लगाए गए हैं।