शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गुंगीचे औषध देऊन बलात्कार केल्याप्रकरणी तरुणास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 15:42 IST

सांगली येथील कोल्हापूर रस्त्यावरील २२ वर्षीय तरुणीस गुंगीचे औषध देऊन, तिच्यावर लॉजमध्ये बलात्कार करून शरीरसंबंधाची चित्रफीत बनवून ती सोशल मीडियावर प्रसारित केल्याप्रकरणी अविनाश संजय पवार (वय १९, रा. पाटवले कुकाना, जि. अहमदनगर) यास शहर पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली.

ठळक मुद्देगुंगीचे औषध देऊन बलात्कार, चित्रफीत सोशल मीडियावर प्रसारितअविनाश संजय पवार यास अटक

सांगली : येथील कोल्हापूर रस्त्यावरील २२ वर्षीय तरुणीस गुंगीचे औषध देऊन, तिच्यावर लॉजमध्ये बलात्कार करून शरीरसंबंधाची चित्रफीत बनवून ती सोशल मीडियावर प्रसारित केल्याप्रकरणी अविनाश संजय पवार (वय १९, रा. पाटवले कुकाना, जि. अहमदनगर) यास शहर पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली. पाटवले कुकाना येथे त्याच्या घरावर छापा टाकून त्यास पकडले. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.अविनाश पवार याची गतवर्षी या तरुणीशी इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर ओळख झाली होती. १५ जून २०१८ रोजी त्याने येथील शासकीय रुग्णालय चौकातील लॉजवर तिला बोलावून घेतले. त्याने शीतपेयातून गुंगीचे औषध तिला पाजले. त्यामुळे तरुणी बेशुद्ध होऊन पडली.अर्धवट शुद्धीवर आल्यानंतर त्याने तिच्यावर बलात्कार केला. शरीरसंबंध करताना त्याने स्वत:च्या मोबाईलवर छायाचित्रे काढली. तसेच चित्रफीतही बनविली. तेव्हापासून ते ४ मे २०१९ पर्यंत त्याने या तरुणीस ब्लॅकमेल करून सातत्याने तिच्यावर बलात्कार केला.

गेल्या आठवड्यातर त्याने तरुणीची अश्लील छायाचित्रे व शरीरसंबंधाची चित्रफीत इन्स्टाग्रामवर तसेच त्याने तयार केलेल्या यु-ट्यूब लिंकवर प्रसारित केली. हा प्रकार समजताच तरुणीने रविवारी शहर पोलीस ठाणे गाठून फिर्याद दाखल केली होती.संशयित पवारच्या शोधासाठी सोमवारी सकाळी शहर पोलिसांचे पथक अहमदनगरला रवाना झाले होते. स्थानिक पोलिसांची मदत घेऊन पथकाने पवारच्या पाटवले कुकाना येथील घरावर छापा टाकून त्यास ताब्यात घेतले. त्याला घेऊन मंगळवारी पहाटे पथक सांगलीत दाखल झाले.

दुपारी त्याला जिल्हा न्यायालयात उभे करण्यात आले होते. न्यायालयाने त्याला चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे. पोलीस निरीक्षक मिलिंद पाटील तपास करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSangliसांगली