शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

आपले सरकार सेवा केंद्राच्या परिचालकांचे मानधन रखडले उपासमारीची वेळ :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 21:14 IST

अतुल जाधव ।देवराष्ट्रे : ग्रामीण भागातील नागरिकांना शासनाच्या सुविधांचा लाभ सुलभरित्या व्हावा, यासाठी महाराष्ट्र शासनाने आपले सरकार सेवा केंद्र प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये सुरू केले. मात्र ही सेवा देण्यासाठी येथे नेमण्यात आलेल्या संगणक परिचालकांना गेल्या सहा महिन्यांपासून मानधन नसल्यामुळे हे परिचालक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. केलेल्या कामाचा मोबदला मिळत नसल्यामुळे जिल्ह्यातील संगणक ...

ठळक मुद्देसहा महिन्यांपासून पैसे न मिळाल्याने आर्थिक कोंडी

अतुल जाधव ।देवराष्ट्रे : ग्रामीण भागातील नागरिकांना शासनाच्या सुविधांचा लाभ सुलभरित्या व्हावा, यासाठी महाराष्ट्र शासनाने आपले सरकार सेवा केंद्र प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये सुरू केले. मात्र ही सेवा देण्यासाठी येथे नेमण्यात आलेल्या संगणक परिचालकांना गेल्या सहा महिन्यांपासून मानधन नसल्यामुळे हे परिचालक आर्थिक अडचणीत सापडले आहेत. केलेल्या कामाचा मोबदला मिळत नसल्यामुळे जिल्ह्यातील संगणक परिचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे.

ग्रामपंचायतीचे रेकॉर्ड अद्ययावत ठेवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपले सरकार सेवा केंद्राची निर्मिती करण्यात आली. हा ठेका एका कंपनीला दिला आहे. या कंपनीच्या माध्यमातून प्रत्येक केंद्रावर एका संगणक परिचालकाची नेमणूक केली आहे. या संगणक परिचालकांच्या मानधनासाठी प्रत्येक ग्रामपंचायत ठराविक रक्कम जिल्हा परिषदेकडे वर्ग करीत असते व त्यातून कंपनी मानधन देत असते.

संगणक परिचालकांना ग्रामपंचायतीची विविध कामे करावी लागत असतात. सर्व रेकॉर्ड अद्ययावत ठेवणे, शासकीय योजनांची माहिती घेणे, नागरिकांना सेवा पुरवणे यासह विविध कामे पार पाडावी लागतात.कडेगाव तालुक्यातील ५५ ग्रामपंचायतींचे कामकाज फक्त ४१ संगणक परिचालक करीत आहेत. यापैकी अनेकांना गेल्या वर्षभरापासून, तर काहींना सहा महिनयांपासून मानधन दिले गेलेले नाही. ग्रामपंचायतींनी मानधनाची रक्कम जिल्हा परिषदेला वर्ग करूनही हे मानधन मिळत नसल्यामुळे परिचालकांतून नाराजी व्यक्त होत आहे.वेगळी योजना करण्याची घोषणा हवेतच...मुख्यमंत्री, ग्रामविकासमंत्री आणि ग्रामविकास सचिव यांच्यासोबत शासकीय बैठक ४ मार्चला वर्षा बंगल्यावर १२ प्रतिनिधींसह झाली. त्यानंतर ५ मार्चला ग्रामविकास मंत्रालयात बैठक होऊन निर्णय झाला. त्यात ज्या ग्रामपंचायतीने मानधनाचा धनादेश दिला नसेल त्यांचे मानधन १५ मेपर्यंत शासन वेगळी योजना तयार करून अदा करेल, असा विश्वास स्वत: मुख्यमंत्री, ग्रामविकासमंत्री व ग्रामविकास सचिव यांनी दिला होता. पण दिलेला शब्द आणि लेखी आश्वासन पाळले नाही. यापेक्षा मोठे दुर्दैव काय?मानधन फक्त सहा हजारजिल्ह्यातील संगणक परिचालकांना कंपनीकडून महिन्याला फक्त सहा हजार मानधनावर काम करावे लागत आहे, तर काही परिचालकांना यापेक्षाही कमी मानधनावर काम करावे लागत आहे. हे मानधनही जिल्हा परिषद व कंपनी वेळेवर देत नाही.

टॅग्स :Sangliसांगलीonlineऑनलाइन