शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

मिरज शहर पोलीस स्टेशन मध्ये पेटवून घेतलेल्या 'त्या' तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2021 11:10 IST

सर्फराज या व्यसनी तरुणाने बुधवारी मध्यरात्री शहर पोलीस ठाण्यातच पेट्रोल ओतून घेऊन स्वतःला पेटवून घेतले. यात तो सुमारे ५० टक्के भाजला होता.

मिरज : मिरज शहर पोलीस स्टेशन मध्ये स्वतःला पेटवून घेतलेल्या तरुणाचा अखेर आज, मृत्यू झाला. सर्फराज महमदली जमखंडीकर (वय २६, रा. गुरुवार पेठ, मिरज) असे या मृत तरुणाचे नाव आहे. बुधवारी (दि.२४) मध्यरात्री शहर पोलीस ठाण्यातच त्याने पेट्रोल ओतून घेऊन स्वतःला पेटवून घेतले होते.

याबाबत माहिती अशी की, सर्फराज या व्यसनी तरुणाने बुधवारी मध्यरात्री शहर पोलीस ठाण्यातच पेट्रोल ओतून घेऊन स्वतःला पेटवून घेतले. यात तो सुमारे ५० टक्के भाजला होता. त्याला सांगली शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मारहाणीची तक्रार घेत नसल्याच्या कारणावरून त्याने हे कृत्य केल्याने शहरात खळबळ उडाली होती.सर्फराज जमखंडीकर नशेत शहर पोलीस ठाण्यात मारहाणीची तक्रार देण्यासाठी पत्नीसोबत गेला होता. यासीन, अबुबकर व आयुब या तिघांनी मला मारहाण केली असून, त्यांना लगेच अटक करा, असे म्हणत त्याने गोंधळ घातला. तो नशेत असल्याने पोलिसांनी त्याच्या तक्रारीबाबत पडताळणी करून दाखल करून घेतो, असे सांगितले. मात्र नशेत असलेल्या सर्फराज यास त्याचा राग आल्याने त्याने तिघांना आताच अटक करा, नाहीतर मी त्यांच्या गाड्या पेटवतो, असे म्हणत त्याने पत्नीच्या हातातून पेट्रोलची बाटली घेऊन अंगावर ओतून स्वतःला पेटवून घेतले होते.

टॅग्स :Sangliसांगलीmiraj-acमिरज