शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

Sangli News: प्रियेसीला घेवून दुचाकीवरुन निघाला, अंधारात वाटेतच विहिरीत कोसळला; युवतीचा बुडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2023 14:14 IST

युवक बचावला, संबंधित युवकांच्या विरोधात तासगाव पोलिसांत तक्रार दाखल

दत्ता पाटील

तासगाव : तासगाव तालुक्यातील दोन वेगवेगळ्या गावातील अल्पवयीन प्रेमी युवक आणि युवती हे मध्यरात्रीच्या सुमारास मोटारसायकलसह विहिरीत पडल्याची घटना घडली. याअपघातात युवतीचा पाण्यात बुडुन मृत्यू झाला, तर युवक बचावला आहे. या घटनेने खळबळ माजली आहे. याबाबत तासगाव पोलिसात नोंद झाली आहे.  तासगाव पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी, या घटनेतील अल्पवयीन युवक हा तालुक्यातील पश्चिम भागातील एका गावचा आहे. त्याची मावशी तालुक्यातील दुसऱ्या एका गावात राहते. काही कारणाने त्याचे मावशीकडे जाणे येणे होते. मावशीच्या जवळपास संबंधित युवती राहत होती. यातुन त्याचे एकमेकांसोबत प्रेम संबंध असल्याची चर्चा होती. यातून त्याच्यात भेटी गाठी सुरू झाल्या.सोमवारी मध्यरात्री या प्रेमी युगलाची भेट झाली. यानंतर ते गावाबाहेर गेले. काही वेळानंतर युवतीला घरी सोडण्यासाठी ते दोघेजण मोटार सायकलवरून घरी परतत असताना वाटेत अंधार असल्याने युवकाला रस्त्याचा अंदाज आला नाही. रस्त्या शेजारी असणाऱ्या विहिरीत ते दोघेजण मोटारसायकल सह कोसळले. युवकाला पोहता येत असल्याने तो बचावला व अंधाऱ्या रात्री तो विहिरी बाहेर आला. पण त्या युवतीला पोहता येत नसल्याने तिचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेनंतर युवतीच्या पालकाने तासगाव पोलिसात संबंधित युवकांच्या विरोधात तासगाव पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. अधिक तपास  पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल शेळके करत आहेत.

टॅग्स :Sangliसांगली