शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

शेतकरी-मजुरांमध्ये इस्लामपुरात संघर्ष

By admin | Updated: December 2, 2014 00:12 IST

दर, वेळापत्रक वादात : बड्या शेतकऱ्यांवर अरेरावीचा आरोप

इस्लामपूर : उरुण-इस्लामपूर परिसरातील धनदांडग्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन नियमबाह्य शेतकामगारांची वेळ व दरपत्रक ठरविले आहे. पण हे कामगारांना मान्य नाही. त्यामुळे शेतकरी व कामगार वर्गात संघर्ष उफाळला आहे. आज सकाळी ८ नंतर शेतात कामास जाणाऱ्या कामगारांना शेतकऱ्यांनीच अडवले. त्यामुळे कामगार वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत होती. यातील काही महिला कामगारांनी माजी नगरसेवक शिवाजी पवार यांच्याकडे धाव घेत आपले गाऱ्हाणे मांडले. परंतु तेही शेतकरी असल्याने त्यांनाही कामगारांची दखल घेता आली नाही.उरुण परिसरातील काही धनदांडग्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शेतात काम करणाऱ्यांचे दर व वेळ निश्चित करण्यासाठी संभूआप्पा मठात शनिवार, दि. १९ रोजी बैठक घेतली. या बैठकीत कामगारांना वेळेचे व दराचे बंधन असणारे पत्रकही वाटण्यात आले. या पत्रकावर कोणाचेही नाव अथवा स्वाक्षरी नाही. जर शेतकऱ्यांनी हे नियम डावलून जादा पैसे देऊन कामगारांना शेतात नेले, तर संबंधित शेतकऱ्याला ५ हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार आहे. दरम्यान, या दराला व वेळेला कामगारांकडून विरोध होत आहे. यामुळेच शेतकरी आणि कामगारांमध्ये संघर्ष उफाळला आहे.वारणा-कृष्णा खोऱ्यात वसलेल्या शेतात काम करण्यासाठी कामगारांची मोठी टंचाई भासत आहे. त्यातच ऊसतोडही मोठ्या प्रमाणात सुरु आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी कामगार मिळणे अवघड होत चालले आहे. याचाच फायदा कामगार उठवत आहेत. धनदांडगे शेतकरी एकमेकांचे कामगार जादा पैसे देऊन पळवतात. त्यामुळे सर्वसामान्य शेतकऱ्यांना याचा फटका बसत आहे. त्यामुळेच की काय, शेतकऱ्यांनीच बेकायदेशीरपणे संघटना स्थापन करुन कामगारांना वेठीस धरण्याचे धोरण अवलंबले आहे. (प्रतिनिधी)स्वाक्षरीविना असलेल्या पत्रकातील नियम व दरनवीन पत्रकानुसार कामगारांनी बरोबर ८ वाजता शेतात काम करण्यास हजर राहणे, ही महत्त्वाची अट आहे. महिलांसाठी एक पारकी सकाळी ७ ते २ पर्यंत १२५ रुपये, ८ ते ५ पर्यंत १५0 रुपये, तर पुरुषांना २00 रुपये, उसाची लागण करण्यासाठी एकरी ३५00 रुपये, सरीची वाकुरी (साखळी) एकरी १५00 रुपये, टोकणी १२00 रुपये, औषध मारणे २५ रुपये पंप, पानस्थळ सोयाबीन काढणी व मळणी २ हजार, कोरडवाहू १८00 रुपये, शाळू उपटून काढणे एकरी १८ पायली, शाळू कापून काढणे एकरी १५ पायली, गहू काढणी-मळणी एकरी १८ पायली, कडबा बांधणी शेकडा १५0 रुपये, उसाचा पाला काढणे एकरी ३५00 रुपये, खोडवा थासणे एकरी १५00 रुपये, पारीने लागवड घालणे एकरी १५00, हरभरा काढून मळून देणे- एकरी १0 पायली असे दर ठरविण्यात आले आहेत.