शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिमंडळ मोठे निर्णय! बांबू धोरण जाहीर, ५ लाख रोजगार; मुंबई HC मध्ये २२२८ पदांना मान्यता
2
"अशी निवडणूक पद्धत भारतात कुठेच नाही, मग फक्त महाराष्ट्रातच का लागू आहे?"; निवडणूक आयोगाला घेरले, 'मविआ'च्या पत्रात काय?
3
दिवाळीला घरी आणा नवी कोरी दुचाकी! देशातील सर्वात स्वस्त ५ बाईक्स, मायलेज-फीचर्स सर्वच दमदार
4
4G आले तरी... २० वर्षांचा प्रवास थांबला, ग्राहक बीएसएनलच्या सेवेला वैतागला, अखेर पोर्टिंगचा निर्णय घेतला...
5
माओवादी चळवळीला मोठा हादरा ! नक्षल्यांचा नेता ‘भूपती’सह ६० जणांनी पोलिसांसमोर केले आत्मसमर्पण
6
इंटरनेटशिवाय करता येणार पेमेंट; RBI ने लॉन्च केला ‘ऑफलाइन डिजिटल रुपया’, जाणून घ्या...
7
उद्धव ठाकरे अन् मविआ नेत्यांसोबत राज ठाकरे मंत्रालयात; मुख्य निवडणूक अधिकाऱ्याशी एकत्र चर्चा, 'इंजिना'ची ठरली दिशा?
8
एकनाथ शिंदेंनी सुरू केलेल्या योजना खरेच बंद होणार का? CM फडणवीसांनी सरळ सांगितले; म्हणाले...
9
सोन्याचे दर ₹१.३० लाखांच्या जवळ, चांदीचा भाव ₹१.८१ लाखांच्या पुढे, कॅरेटनुसार पाहा नवे दर
10
रोहित-विराट संदर्भातील 'त्या' प्रश्नावर गंभीर यांचं मोठं वक्तव्य; नेमकं काय म्हणाले कोच? जाणून घ्या सविस्तर
11
Tata Motors Demerger: टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये दिसली ४०% ची घसरण, काय आहे यामगची खरी कहाणी आणि पुढे काय होणार? जाणून घ्या
12
Viral: बंगळुरुमध्ये घरकाम करणाऱ्या बाईचा पगार ₹४५,०००; महिलेच्या दाव्याने सोशल मीडियावर खळबळ...
13
धक्कादायक! पतीशी वाद, रागातून आईकडूनच जुळ्या मुलांची हत्या, स्वत: चौथ्या मजल्यावरुन मारली उडी
14
तंत्र-मंत्र, जारण-मारण, गेंडे आणि म्हशी! आसाममध्ये गूढ जंगलात काळी जादू करणारं गाव
15
राऊत म्हणतात, राज ठाकरे सोबत जाण्यास इच्छूक; पण काँग्रेस नेते म्हणाले, मनसेबाबत चर्चा नाही!
16
टॅक्स फ्री ४० लाखांचा फंड! पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत दरमहा इतके गुंतवा अन् कोट्यधीश व्हा
17
४ मुली पदरात, नवऱ्याने सोडलं पण 'तिने' धाडस केलं; सुरू केला व्यवसाय, आता लाखोंची मालकीण
18
भारताची खासगी बँक विकली जाणार! दुबईच्या शेखची मोठी बँक हजारो कोटी रुपये ओतणार, RBI ने दिला होकार...
19
छिंदवाडा'मध्ये झालेल्या मुलांच्या मृत्यूवर 'WHO' ने कडक कारवाई केली; या तीन सिरपबाबत इशारा दिला

Sangli: गणेश आगमन मिरवणुकीचे शुटिंग करताना डीजेमुळे कार्यकर्त्याचा मृत्यू, मिरजेतील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2025 11:46 IST

मोबाईलवर चित्रीकरण करताना कोसळला

मिरज : मिरजेत गणेश आगमन मिरवणुकीत बुधवारी रात्री नऊ वाजता डीजेच्या दणदणाटात एकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. बाबासाहेब कलगुटगी (वय ६०) यांना मिरवणुकीत डीजे वाजत असताना अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांचा मृत्यू झाला.मिरजेत बुधवारी गणेश आगमन मिरवणुकीत अनेक मंडळांनी डीजेचा जोरदार वापर केला. रात्री उशिरापर्यंत डीजेचा दणदणाट सुरू होता. वडर गल्ली गणेश मंडळानेही डीजेसह मिरवणूक काढली होती. मिरवणुकीत मंडळाचा कार्यकर्ता असलेले बाबासाहेब कलगुटगी हा सुद्धा ट्रॅक्टरवर बसले होते. मिरवणूक रात्री नऊ वाजता मार्केट परिसरात आली असताना बाबासाहेब हे तेथे मोबाईलवर चित्रीकरण करत होते. डीजेचा दणदणाट सुरू असताना अचानक बाबासाहेब तेथेच कोसळले. त्यांना तातडीने उपचारासाठी खाजगी रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली होती. कलगुटगी यांना पूर्वीपासून हृदयविकाराचा त्रास होता. त्यातच कानठळ्या बसवणाऱ्या कर्कश आवाजाने त्यांच्या हृदयावर ताण येऊन त्यास झटका आल्याचा अंदाज आहे. बाबासाहेब हे मुरूम पुरवठ्याचा व्यवसाय करीत होते. त्यांच्या आकस्मिक मृत्यूने कुटुंबीयांचा आक्रोश सुरू होता.

नियमाचे उल्लंघनमिरज शहरात मिरवणुकीत मंडळांनी डीजेचा वापर करू नये यासाठी गेले महिनाभर पोलिसांनी प्रबोधन मोहीम राबवली होती. मात्र बुधवारी गणेश आगमन मिरवणुकांमध्ये अनेक मंडळांनी डीजेचा वापर करून दणदणाट केला. या दणदणाटात एकाचा जीव गेल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.