शहरं
Join us  
Trending Stories
1
BJP New President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष महिला? निर्मला सितारामन यांच्यासह 'ही' ३ नावे चर्चेत!
2
One Big Beautiful Bill Passed : डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा विजय, अमेरिकेच्या संसदेत 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; नेमकं काय आहे यात?
3
"गरीब हिंदूंना कशाला मारताय? हिंमत असेल तर नळबाजार, मोहम्मद अली रोड येथे जाऊन…’’, नितेश राणेंनी दिलं आव्हान 
4
Today Daily Horoscope: कोणत्या राशीला आज धनलाभाचा योग? जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
5
‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ विजेत्या गावांना प्रत्येकी २५ लाख; ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची घोषणा
6
पदवी आहे, पण काम भलतेच! नोकरीचे वास्तव; पीरियॉडिक लेबर फोर्स सर्व्हेमधून समोर
7
रायकर पाड्यातील विद्यार्थ्यांचा शाळेत जाण्यासाठी जीवघेणा प्रवास; वैतरणा नदी तराफ्यावरून करावी लागते पार
8
पुणे हादरले : घरात घुसून तरुणीवर बलात्कार, तिच्याच मोबाइलवर काढले फोटो ; संगणक अभियंता तरुणी राहात होती उच्चभ्रू सोसायटीत
9
उद्धव-राज : जुन्या जखमांचा हिशेब कसा होणार?
10
यूपीतील शेतकऱ्यांच्या नावे नांदेडमध्ये पीक विमा; ४० सुविधा केंद्र चालकांवर गुन्हा; त्यात ९ जण परळीचे
11
दलाई लामांना ड्रॅगन-विळखा
12
कार चालकाची चूक असल्यास भरपाई मिळणार नाही; सर्वोच्च न्यायालयाने दिले निर्देश
13
लंडनची डॉक्टर मैत्रीण पोलिसांच्या रडारवर; दादरमधील अत्याचार प्रकरणातील शिक्षिकेच्या वैद्यकीय चाचण्या पूर्ण; १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
14
बनावट लेटरहेडद्वारे आमदार निधी लाटल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल; आ. प्रसाद लाड यांच्या तक्रारीवरून तपास सुरू
15
टेस्टमध्ये फुटबॉलचं ट्विस्ट! हॅरी ब्रूकनं खांद्यानं उडवला स्टंपवरचा चेंडू; आधी पंतनं केली टाइमपास करतोय अशी तक्रार, मग...
16
"भारताने पाकिस्तानी एअरबेसवर 11 क्षेपणास्त्रे डागली, अल्लाहतालाने..."; इस्लामिक स्कॉलर्ससमोर पाकिस्तानचं रडगाणं!
17
ENG vs IND : भेदक मारा अन् 'स्लिप'मध्ये जागता पहारा! टीम इंडियानं उडवली यजमान इंग्लंडची झोप
18
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
19
शुबमन गिलनं उद्ध्वस्त केला ४६ वर्षांपूर्वीचा 'महा रेकॉर्ड'; गावसकर, सचिन, द्रविड अन् शास्त्रींना मागे टाकत बनला 'NO.1'
20
ENG vs IND : बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीपचा "मैं हूँ ना...शो"! दोन्ही शतकवीरांच्या पदरी भोपळा

साडेसहा कोटींची कामे ऐनवेळी घुसडली

By admin | Updated: April 10, 2015 00:25 IST

दिग्विजय सूर्यवंशी : महापौर कांबळे यांच्याकडून बेकायदा ठराव

सांगली : स्वत:ला कायदेपंडित म्हणविणाऱ्या महापौर विवेक कांबळे यांनी गत महासभेत साडेसहा कोटींची कामे ऐनवेळी घुसडल्याचा आरोप विरोधी पक्षनेते दिग्विजय सूर्यवंशी यांनी गुरुवारी पत्रकार बैठकीत केला. प्रशासनाने सूचविलेली अनेक कामे महापौरांनी परस्परच बदलली असून, इतिवृत्त मंजुरीपूर्वीच या कामांची अंमलबजावणी करण्याच्या हालचाली सुरू असल्याचेही ते म्हणाले. सूर्यवंशी म्हणाले की, महापौर कांबळे महासभेत वारंवार नियमावर बोट ठेवतात. कायद्यानुसारच काम करणार, असे जाहीरपणे सांगतात; पण त्यांच्याकडून बेकायदा व भ्रष्ट कामांना पाठबळ दिले जात आहे. १९ मार्चच्या महासभेत महापौरांनी महासभेला अंधारात ठेवून ऐनवेळी ६ कोटी ३४ लाख रुपयांची कामे घुसडली आहेत. हा निधी १३ व्या वित्त आयोगाकडून पालिकेला प्राप्त झाला होता. प्रशासनाने या निधीतून सूचविलेली कामेही त्यांनी बदलली आहेत. या निधीतून आरोग्य विभासासाठी दीड कोटी, कचरा डेपोअंतर्गत रस्त्यासाठी ५० लाख, पाणीपुरवठ्याच्या थकित बिलासाठी एक कोटी ८० लाख, बांधकामसाठी दीड कोटी, गॅस्ट्रो साथ कामासाठी ३८ लाख व पाणीपुरवठ्यासाठी ६६ लाखांचा निधी वितरण करण्याची शिफारस प्रशासनाने केली होती. यातील कचरा डेपोअंतर्गत रस्त्यांच्या ५० लाखांचा निधी इतरत्र वर्ग केला आहे. त्याशिवाय गॅस्ट्रोसारख्या साथीच्या कामासाठीचा निधी वळविला आहे. हा सारा निधी रस्ता डांबरीकरण, गणेश तलाव सुशोभिकरणावर खर्च होणार आहे. वस्तुत: गणेश तलावावर आतापर्यंत दहा कोटी खर्च झाले आहेत. वित्त आयोगाच्या १६ कोटींच्या निधीतूनही गणेश तलावासाठी ६० लाखांची तरतूद केली आहे. आता साडेसहा कोटींच्या निधीतून ४० लाखांची तरतूद केली आहे. हे कामही एकाच ठेकेदाराला दिले आहे. महासभेत ऐनवेळी ठराव झाला असून, त्याचे इतिवृत्त अद्याप मंजूर झालेले नाही. तरीही महापौरांकडून या कामाच्या अंमलबजावणीचा ठराव संबंधित विभागाकडे पाठविण्यात आला आहे. कायद्याची भाषा करणाऱ्या महापौरांनी बेकायदेशीर कृत्य केल्याचा आरोपही दिग्विजय सूर्यवंशी यांनी केला. (प्रतिनिधी)