पलूस शहरातील प्रभाग सातमध्ये सतत अपुरा व कमी दाबाने हाेणाऱ्या पाणी पुरवठ्याबाबत अनेक वेळा पाठपुरावा करूनही नगर परिषदेने कसलीही दखल घेतली नाही. या प्रश्नी येसुगडे यांनी निर्वाणीचा मार्ग म्हणून गांधीगिरी पद्धतीने मुख्याधिकारी सुमित जाधव यांना निवेदन दिले. पलूस शहर अनेक समस्यांना ग्रस्त आहे, लाखो रुपयांचा निधी खर्च करूनही ज्यासाठी तो नोंदी खर्ची दाखवला तो विकास मात्र कोठेच दिसत नाही. याबाबत स्वाभिमानी विकास आघाडी लवकरच रस्त्यावर उतरणार असल्याचे ही त्यांनी सांगितले.
यावेळी पलूस शहर स्वाभिमानी विकास आघाडीचे नगरसेवक कपिल गायकवाड, तेथील रहिवासी विक्रम देसाई, दिलीप महाजन, शौकत मुजावर, खुदिजा मुजावर, रंजना गायकवाड, शशिकला कदम, मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
फोटो : १७ पलूस १
ओळ: पलूस नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देताना नीलेश येसुगडे आदी.