शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

मुलींच्या तस्करीतील महिलेस सक्तमजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 16:28 IST

वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींची तस्करी करून त्यांचा सौदा करणाऱ्या जुलेखाबी हसनसाब मुजावर (वय ६०, रा. वैभवनगर, चर्चजवळ, बेळगाव) हिला दोषी धरुन चार वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. जिल्हा व सत्रन्यायाधीश ए. एन. पाटील यांनी गुरुवारी हा निकाल दिला.

ठळक मुद्देमुलींच्या तस्करीतील महिलेस सक्तमजुरीअनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा

सांगली : वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींची तस्करी करून त्यांचा सौदा करणाऱ्या जुलेखाबी हसनसाब मुजावर (वय ६०, रा. वैभवनगर, चर्चजवळ, बेळगाव) हिला दोषी धरुन चार वर्षे सक्तमजुरी व एक हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. जिल्हा व सत्रन्यायाधीश ए. एन. पाटील यांनी गुरुवारी हा निकाल दिला.गोकाक (जि. बेळगाव) येथील इंडियन रेस्क्यू मिशन या समाजसेवी संस्थेचे जेम्स वर्गीस यांना जुलेखाबी मुजावर ही वेश्या व्यवसायासाठी मुलींची तस्करी करते. अनेकदा या मुलींची ती विक्रीही करते, अशी माहिती मिळाली होती. ज्या मुलींची घरची परिस्थिती गरीब आहे, अशा मुलींना जाळ्यात ओढून ती सांगलीत व्यवसायासाठी विकत असे.

जेम्स वर्गीस यांनी ही माहिती तत्कालीन पोलीस उपअधीक्षक सुहास बावचे यांना सांगितली. बावचे यांच्या पथकाने जेम्स वर्गीस यांच्या मदतीने मुजावर हिच्याशी संपर्क साधून मुली पाहिजे, असे सांगितले. मुजावर यांनी वर्गीस यांना बेळगावला बोलाविले. त्यानुसार ते पोलीस घेऊन तिला भेटण्यास गेले. मुजावर हिने दोन अल्पवयीन मुली दाखविल्या. एका मुलीचे २० हजार व कमिशन ४० हजार रुपये, असे एकूण ६० हजार रुपये देण्याची मागणी केली. पथकाने सौदा मान्य असल्याचे सांगितले.पथकाने तिला सात हजार रुपये इसारत रक्कम देऊन मुलींना सांगलीत घेऊन येण्यास सांगितले. त्यानुसार दुसºयादिवशी मुजावर मुलींना घेऊन सांगलीत आली. काँग्रेस भवनजवळील हॉटेल पंचरत्नजवळ तिला बोलाविले. पथकाने तिला घेऊन येण्यासाठी गाडीही पाठविली होती.

ती मुलींना घेऊन आल्यानंतर पथकाने ३० हजार रुपये दिले. पैसे मोजत असताना तिला पकडले. तिच्या ताब्यातून दोन मुलींची सुटका करण्यात आली होती.१४ जून २०१६ रोजी ही कारवाई केली होती. तिच्याविरुद्ध अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कायद्यांतर्गत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन पोलीस निरीक्षक शिल्पा यमगेकर यांनी तपास केला होता. 

टॅग्स :Courtन्यायालयCrime Newsगुन्हेगारीSangliसांगली