शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: माडग्याळ येथे मटका अड्ड्यावरच महिला सरपंचांनी मारला ठिय्या, मटका एजंटाची उडाली भंबेरी

By हणमंत पाटील | Updated: February 15, 2024 13:36 IST

उमदी : माडग्याळ (ता. जत) येथील महिला सरपंच यांनी गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर छापा मारून तेथेच ...

उमदी : माडग्याळ (ता. जत) येथील महिला सरपंच यांनी गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर छापा मारून तेथेच ठिय्या मारला. या प्रकाराने मटका एजंटाची मात्र चांगलीच भंबेरी उडाली. यावेळी सरपंच अनिता माळी, उपसरपंच बाळासाहेब सावंत, महिला सदस्या निर्मला कोरे, सविता सावंत, निकिता कांबळे, शोभा माळी, सदस्य महादेव माळी व पोलिस यांनी एकत्र येऊन कारवाई केली. जोपर्यंत जुगार अड्डा बंद होत नाही, तोपर्यंत तेथून न हलण्याचा पवित्रा घेतला व ठिय्या मारला.माडग्याळमधील अवैध धंदे बंद करावेत, अशी गेल्या कित्येक दिवसांपासून मागणी आहे. तसे पोलिस ठाण्यांना पत्रव्यवहारदेखील दिलेले होते. मात्र, याकडे पोलिसानी दुर्लक्ष केले. त्यामुळे महिला सदस्यांनी आक्रमक भूमिका घेत मटका अड्ड्यावर थेट छापा टाकण्याचा निर्णय घेतला. यावेळी मटका एजंटानेच या महिला सदस्यांना धमकावण्याचा प्रयत्न केल्याचे महिला सरपंच यांचे म्हणणे आहे. शेवटी महिलांच्या मागे न हटण्याच्या भूमिकेमुळे पोलिसानी येऊन कारवाई केली. अखेर पोलिसांना येऊन एजंटला ताब्यात घेतले. यावेळी पोलिसांनी संशयित भीमराव महादेव पाटील (रा. संख, ता. जत) यांच्याकडून बेकायदेशीरपणे कल्याण नावाचा मटका व जुगार आकड्याचा खेळ घेत असताना असा एकूण २,५२५ रुपयांचे साहित्य जप्त केले. 

टॅग्स :Sangliसांगली