शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत बसस्थ‌ानकावर गर्दीचा फायदा घेऊन दागिने लुटणाऱ्या महिलेस अटक, साडेसहा लाखांचा ऐवज जप्त

By शरद जाधव | Updated: October 23, 2022 20:40 IST

मध्यवर्ती बसस्थानकावरून प्रवाशांच्या ऐवजावर डल्ला मारण्याचे प्रकार वाढले होते. त्यानुसार सांगली शहर पोलिसांनी खास पथक तयार करून याचा तपास सुरू केला होता.

सांगली : शहरातील मध्यवर्ती बसस्थानकात गर्दीचा फायदा घेऊन प्रवासी महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेस पोलिसांनी जेरबंद केले. अनघा अनंत जोशी (वय ६१, रा. शिवाजीनगर, रत्नागिरी) असे संशयित महिलेचे नाव असून, तिच्याकडून सहा लाख ३१ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व दहा हजार रुपयांची रोकड, असा सहा लाख ४१ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

मध्यवर्ती बसस्थानकावरून प्रवाशांच्या ऐवजावर डल्ला मारण्याचे प्रकार वाढले होते. त्यानुसार सांगली शहर पोलिसांनी खास पथक तयार करून याचा तपास सुरू केला होता. बसस्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, एक सुशिक्षित वयस्कर महिला गर्दीचा फायदा घेऊन चोरी करून निघून जात असल्याचे दिसून आले होते.

यानंतर पोलिसांनी तपास आणखी वाढवत जयसिंगपूर, हातकणंगले, कोल्हापूर, शाहूवाडी, शिरोळ, मलकापूर, साखरपा व रत्नागिरी येथील बसस्थानकातील सीसीटीव्हीचे फुटेज तपासले. त्यात संशयित अनघा जोशी ही सांगलीत चोरी करून याच मार्गावरून रत्नागिरीला जात असल्याचे दिसून आले. चार ते पाच महिन्यांपासून पोलीस या महिलेची माहिती घेत होते. त्यानुसार पोलिसांनी सांगली बसस्थानकावर चोरी करणारी जोशी हीच महिला असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानुसार तिला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यानंतर तिने चोरीची कबुली दिली. तिच्याकडून सहा लाख ३१ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने व रोख दहा हजार रुपये जप्त करण्यात आले. सांगली शहर पोलिसांच्या पथकाने ही कामगिरी केली.

जोशी रेकॉर्डवरील गुन्हेगार -प्रवाशांच्या ऐवजावर डल्ला मारणारी जोशी पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. यापूर्वी तिच्यावर लांजा व देवरुख पोलिसांतही गुन्हे दाखल आहेत. तिच्याकडून सांगली शहर, शिरोळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आठ गुन्हे उघडकीस आले आहेत.

सुशिक्षित दाखवत चोऱ्या -पोलिसांनी अटक केलेली अनघा जोशी ही रत्नागिरी येथून सांगलीत येऊन चोऱ्या करत असे. वयानेही ज्येष्ठ असलेल्या या संशयित महिलेबाबत कोणालाही संशय येत नसे. पोलिसांच्या पहिल्या तपासालाही त्यामुळे आव्हान निर्माण झाले होते. 

टॅग्स :RobberyचोरीThiefचोरPoliceपोलिस