शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
3
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
4
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
5
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
6
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
7
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
8
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
9
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
10
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
11
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
12
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
13
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
14
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
16
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
17
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
18
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
19
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
20
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख

चर्चेविनाच अर्थसंकल्पास मंजुरी

By admin | Updated: February 27, 2015 23:18 IST

इस्लामपूर पालिका : ९८ कोटी ५४ लाखांचा अर्थसंकल्प; दहा मिनिटात सभा गुंडाळली

इस्लामपूर : इस्लामपूर शहरासाठीच्या २0१५-१६ च्या ९८ कोटी ५४ लाख १५ हजार १२३ रुपयांच्या अर्थसंकल्पाला सभागृहाने आज (शुक्रवारी) मंजुरी दिली. याचवेळी २0१४—१५ च्या ११0 कोटी ३३ लाखांच्या सुधारित अर्थसंकल्पालाही मंजुरी देण्यात आली. अर्थसंकल्पावर कोणतीही चर्चा न होता केवळ दहा मिनिटात ही अर्थसंकल्पीय सभा गुंडाळण्यात आली. यामुळे पालिकेच्या अध्यायात आणखी एका विक्रमाची नोंद झाली.नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष सभेत कोणतीही करवाढ नसलेला हा १0 लाख ९२ हजार ५४३ रुपयांच्या शिलकीचा अर्थसंकल्प दहा मिनिटांची खळखळ झाल्यानंतर सभागृहाने स्वीकारला. सभेच्या सुरुवातीला विरोधी पक्षनेते विजय कुंभार यांनी खुल्या नाट्यगृहाला माजी नगराध्यक्ष अशोकदादा पाटील यांचे नाव द्यावे, अशी मागणी करणारे पत्र दिल्याकडे लक्ष वेधत या विशेष सभेत तो विषय घ्यावा, असे मत मांडले. सत्तारुढ गटाचे नगरसेवक खंडेराव जाधव, अ‍ॅड. चिमण डांगे यांनी त्याला आक्षेप घेत, विशेष सभेत अन्य कोणताही विषय घेतला जात नाही असे सुनावत, यापूर्वीच आपणही नामकरणासाठी प्रशासनाकडे पत्र दिल्याचे जाधव यांनी स्पष्ट केले. त्यावर नगराध्यक्षांनीही अर्थसंकल्पीय सभा आहे, नंतरच्या सभेत त्यावर विचार करू, असे आश्वासन दिले.प्रभारी लेखापाल विजय टेके यांनी अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यासाठीची अनुमती मागितल्यावर सत्तारुढ गटाचे ज्येष्ठ नगरसेवक बी. ए. पाटील यांनी या अर्थसंकल्पाला हरकतीच्या मुद्यांद्वारे विरोध नोंदवून नगराध्यक्षांकडे हरकत सुपूर्द केली. त्यावर सभागृहात शांतता पसरली. मुख्याधिकारी नीलेश देशमुख यांनी या हरकतींच्या मुद्यावर नजर फिरवून प्रतिक्रिया देण्यास असमर्थता दर्शवली. उपनगराध्यक्ष संजय कोरे यांनी हरकतींचे गांभीर्य पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील यांना सांगितल्यावर त्यांनी बी. ए. पाटील यांच्या आसनाजवळ येऊन चर्चा केली. तुमच्या हरकती विचारात घेऊन अर्थसंकल्पात योग्य ती दुरुस्ती केली जाईल, असे विजयभाऊ पाटील यांनी स्पष्ट केल्यावर शेवटी बी. ए. पाटील यांनी सभागृहाचा मान ठेवत अर्थसंकल्प मंजूर करण्याची सूचना मांडली. त्याला चंद्रकांत पाटील यांनी अनुमोदन दिल्यावर सभागृहाने हे अंदाजपत्रक कोणत्याही चर्चेविना मंजूर केले. (वार्ताहर)कोणतीही करवाढ नाहीया वर्षाच्या अंदाजपत्रकात कोणतीही करवाढ सुचवण्यात आलेली नाही. अंदाजपत्रकात २0 कोटी ४७ लाखांची महसुली जमा आहे. ३५ कोटी ४ लाखांची भांडवली जमा, तर ३४ कोटी ३१ लाखांची असाधारण जमा आहे. तसेच २0 कोटी १४ लाखांचा महसुली खर्च, ७४ कोटी ७४ लाखांचा भांडवली खर्च आणि ३४ कोटी ८९ लाखांचा असाधारण खर्च गृहीत धरुन १0 लाख ९२ हजार ५४३ रुपयांचे शिलकी अंदाजपत्रक सभागृहाने स्वीकारले.आरोग्य विभागावरील दुहेरी खर्चाचा वादबी. ए. पाटील यांनी दिलेल्या हरकतींमध्ये आरोग्य विभागावर होणाऱ्या दुहेरी खर्चाचा गंभीर मुद्दा मांडला आहे. पालिकेचे आरोग्य विभागाकडील ७७ कर्मचारी विविध विभागात काम करतात. त्यांच्यावर १ कोटी ८६ लाख रुपये पगारावर खर्च होतात, तर स्वच्छता ठेक्यासाठी पुन्हा १ कोटी ७५ लाखांची तरतूद करण्यावर आक्षेप घेतला आहे. आस्थापनेवर होणारा खर्च प्रमाणापेक्षा जास्त आहे. बदल्या झालेल्या अधिकाऱ्यांना कार्यमुक्त करा, वाहनचालक ठेका, सुरक्षा रक्षक ठेका, पाणी पुरवठा विभागाचा ठेका, दिवाबत्ती दुरुस्ती ठेका, वृक्षारोपण अशा मुद्यांवर आक्षेप नोंदवला आहे.