शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

लोकनृत्य स्पर्धेने सांगलीत जिंकली रसिकांची मने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2019 00:07 IST

येथील शांतिनिकेतन लोकविद्यापीठात सुरू असलेल्या लोकोत्सवात शनिवारी लोकनृत्य व लावणी स्पर्धा उत्साहात पार पडल्या. बहारदार लोकनृत्य सादरीकरणाने रसिकांची मने जिंकली. त्याचबरोबर आर्ट फेस्टिव्हललाही प्रारंभ झाला.

ठळक मुद्देशांतिनिकेतनमध्ये राज्यातील तीसहून अधिक संघांचा सहभागलोकोत्सवास प्रतिसाद

सांगली : येथील शांतिनिकेतन लोकविद्यापीठात सुरू असलेल्या लोकोत्सवात शनिवारी लोकनृत्य व लावणी स्पर्धा उत्साहात पार पडल्या. बहारदार लोकनृत्य सादरीकरणाने रसिकांची मने जिंकली. त्याचबरोबर आर्ट फेस्टिव्हललाही प्रारंभ झाला. लोकोत्सवांतर्गत घेण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेसाठी राज्यातून साठ कलाकारांनी आपली रंगावलीचे काम सुरू केले आहे.

प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील यांच्या ८७ व्या जयंतीनिमित्त लोकोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. लोकोत्सवाच्या दुसऱ्यादिवशी शनिवारी लोकनृत्य, लावणी व रांगोळी स्पर्धा झाल्या; तर आर्ट फेस्टिव्हलला सुरुवात झाली.

शनिवारी सकाळच्या सत्रात लोकनृत्य व लावणी स्पर्धांना प्रारंभ झाला. स्पर्धेत सहभागी स्पर्धकांनी बहारदार लावणी नृत्य सादर करून उपस्थितांना प्रभावित केले; तर लोकनृत्य स्पर्धेतही राज्यभरातील ३० हून अधिक संघांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे उद्घाटन टीव्ही कलाकार कल्याणी चौधरी यांच्याहस्ते करण्यात आले. परीक्षक म्हणून पूजा डांगे, दीपक बिडकर, सोनाली रजपूत, स्मिता पाटील, प्रदीप कांबळे, शुभांगी यादव यांनी काम पाहिले.

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे लावणी स्पर्धा : प्रथम क्रमांक निकिता कांबळे (सातारा), द्वितीय शिवम मगदूम (कोल्हापूर), तृतीय हर्षाली बेलवलकर (सांगली), उत्तेजनार्थ सारिका भागवत, (म्हसवड), वसुंधरा माळी (सांगली) लोकनृत्य स्पर्धा : प्रथम यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, इस्लामपूर, द्वितीय रंगमल्हार कला अकॅडमी, सांगली, तृतीय युफोरिया डान्स अकॅडमी, इचलकरंजी, चतुर्थ मालतीताई वसंतदादा पाटील कन्या महाविद्यालय, इस्लामपूर आणि पाचवा क्रमांक जिल्हा परिषद शाळा, सावंतपूर वसाहत.यावेळी नवभारत शिक्षण मंडळाचे संचालक गौतम पाटील, बी. आर. थोरात, तानाजीराव मोरे, डी. एस. माने, प्रशासकीय अधिकारी एम. के. अंबोळे आदी उपस्थित होते.परिसरात कलात्मक सजावटीने रंग भरला...लोकोत्सवानिमित्ताने परिसरात कलात्मक सजावट करण्यात आली आहे. भल्या मोठ्या मुग्यांची झाडावर चढत असलेली रांग, कपड्यांची झालर, सेल्फी पॉर्इंट यासह इतर सजावट करण्यात आली आहे. कलाविश्वचे प्राचार्य भाऊसाहेब ननावरे, लक्ष्मण थोरात, शशिकांत जगताप, सत्यजित वरेकर, रचना जाधव या शिक्षकांसह श्रीधर भट, अभिजित पाटील, महेश सुडके, श्रीराम यादव आदी विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.सांगलीच्या शांतिनिकेतनमध्ये लोकोत्सवाअंतर्गत शनिवारी राजस्थानी लोकनृत्य सादर करून युवतींनी उपस्थितांची मने जिंकली.

टॅग्स :Sangliसांगलीcollegeमहाविद्यालय