नेर्ले येथे प्रचार सभेत कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी भाषण केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नेर्ले : कृष्णा सहकारी साखर कारखान्यावर यशवंतराव मोहिते यांचे विचार आणण्यासाठी तसेच सभासद व कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी रयत पॅनलला विजयी करा, असे आवाहन सहकार राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी केले.
नेर्ले ( ता. वाळवा) येथे रयत पॅनलच्या प्रचार बैठकीमध्ये ते बोलत होते. यावेळी उमेदवार प्रशांत पाटील, शंकरराव रणदिवे, अनिल पाटील, गणेश पाटील, मनोहर थोरात, युवा नेते जितेश कदम उपस्थित होते.
महाराष्ट्रात सहकार चळवळ यशवंतराव मोहिते यांनी निर्माण केली. त्यातूनच कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निर्मिती झाली, असे सांगून विश्वजित कदम म्हणाले, शेतकऱ्यांना चांगला दर, कारखाना कार्यक्षेत्रातील विकास यासाठी कारखान्यावर सामान्य लोकांच्या हिताचे पॅनल निवडून आणावे लागेल. त्यासाठी डॉ. इंद्रजित मोहिते यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या रयत पॅनलला शेतकरी सभासदांनी भरघोस मतदान करावे.
सभासद वसंतराव पाटील, शंकरराव रणदिवे यांनीही मार्गदर्शन केले. सुरज पाटील यांनी आभार मानले. यावेळी दीपक महाडिक, जयकर पाटील, नानासाहेब जांभळे उपस्थित होते.