शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

..आता राहुल गांधींच्या प्रतिमेला जोडे मारणार?, आमदार गोपीचंद पडळकरांचा उद्धव ठाकरेंना प्रश्न

By श्रीनिवास नागे | Updated: April 3, 2023 16:28 IST

नवीन राष्ट्राच्या निर्मितीमध्ये सावरकर यांचे मोठे योगदान

आटपाडी : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत मणीशंकर अय्यर यांनी खालच्या पातळीवर जाऊन विधान केले, तेव्हा हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी स्वतः हातामध्ये जोडा घेऊन त्यांच्या प्रतिमेला जोडे मारले होते. उद्धव ठाकरे आता राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोड्याने मारणार आहेत का, हे त्यांनी स्पष्ट करावे, असे आव्हान आमदार पडळकर यांनी येथे दिले. वीर सावरकर गौरव यात्रेत ते बोलत होते. पडळकर म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा विचार प्रखर राष्ट्रवादाचा होता. तत्कालीन परिस्थितीमध्ये ज्या चुकीच्या रूढी, परंपरा होत्या, त्यांना बाजूला सारून नवीन राष्ट्राच्या निर्मितीमधील सावरकर यांचे मोठे योगदान आहे.

परंतु वर्षभरामध्ये काँग्रेस आणि काँग्रेस नेते राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल खालच्या पातळीवर जाऊन टीकाटिपणी करीत आहेत. मुळात काँग्रेस आणि राहुल गांधी यांना सावरकर समजणारच नाहीत. ते ज्या पद्धतीने सावरकर यांचा अपमान करत आहेत, ते महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही.यावेळी हर्षवर्धन देशमुख, अनिल पाटील, जयवंतराव सरगर, ब्रह्मानंद पडळकर, विलासराव काळेबाग, मोहन रणदिवे, जनार्दन झिंबल, विष्णुपंत अर्जुन, नारायणराव चवरे, दादासाहेब मरगळे, रूपेशकुमार पाटील, आबासाहेब पुजारी, अनिल सूर्यवंशी, यल्लाप्पा पवार, राजेंद्र खरात उपस्थित होते.

टॅग्स :SangliसांगलीGopichand Padalkarगोपीचंद पडळकरRahul Gandhiराहुल गांधी