शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठी संघर्ष करावा लागणार : वैभव नायकवडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 17:22 IST

शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्यक्ष पाणी येईपर्यंत संघर्ष करावा लागणार आहे. येत्या २६ जून रोजी आटपाडीत २७ व्या पाणी परिषदेचे आयोजन केले आहे. संघटित राहून आपली ताकद दाखविण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहा, असे आवाहन हुतात्मा संकुलाचे नेते वैभव नायकवडी यांनी केले.

ठळक मुद्देपाण्यासाठी संघर्ष करावा लागणार : वैभव नायकवडी आटपाडीत शेतमजूर, कष्टकरी, शेतकरी संघटनेची बैठक

आटपाडी : शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्यक्ष पाणी येईपर्यंत संघर्ष करावा लागणार आहे. येत्या २६ जून रोजी आटपाडीत २७ व्या पाणी परिषदेचे आयोजन केले आहे. संघटित राहून आपली ताकद दाखविण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहा, असे आवाहन हुतात्मा संकुलाचे नेते वैभव नायकवडी यांनी केले.आटपाडीतील तांबडा मारुती देवालयाच्या सभागृहात शेतमजूर, कष्टकरी, शेतकरी संघटनेची शुक्रवारी बैठक झाली. यावेळी बोलताना नायकवडी म्हणाले, पाण्याचे समान वाटप करण्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागणार आहे. क्रांतिवीर नागनाथअण्णांनी १३ दुष्काळी तालुक्यात पाणी येण्याचे स्वप्न पाहिले होते, हे त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लढा तीव्र करण्यात येईल. शेतात पाणी बघणार आणि मगच चळवळ थांबणार आहे. पाणी परिषद यशस्वी होण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले.आमदार गणपतराव देशमुख म्हणाले, पावसाळ्यात पुराचे पाणी कृष्णा नदीतून वाहून जाते. त्यावेळीच नियोजन करून दुष्काळी भागाला हे वाहून जाणारे पाणी दिले पाहिजे. पाण्याचे समन्यायी वाटप झाले पाहिजे.माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख म्हणाले, टेंभू योजनेची पाण्याची आवर्तने ठरली पाहिजेत. आटपाडी तालुक्यातील वगळलेल्या गावांचा समावेश टेंभू योजनेत केला गेला पाहिजे. राजेवाडी तलावात पाणी आले पाहिजे.बैठकीत प्रारंभी क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी प्रा. बाबूराव गुरव, प्रा. शिवाजीराव काळुंगे, अ‍ॅड. बाळासाहेब बागवान, प्रा. विश्वंभर बाबर, चंद्रकांत देशमुख, आर. एस. चोपडे, शिवाजीराव पाटील, बाळासाहेब नायकवडी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईSangliसांगली