शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

पाण्याच्या टॅँकरवर जीपीएस यंत्रणा बसणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2019 11:02 IST

जत तालुक्यात दिवसेंदिवस तीव्र उन्हाळ्याचे चटके जाणवू लागले आहेत. प्रशासनाने टंचाईग्रस्त गावात उपाययोजना सुरू केल्या आहेत. तालुक्यातील ९३ गावे व त्याखालील ६७२ वाड्या-वस्त्यांवर १०९ टँकरव्दारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू आहे. अशावेळी बोगस फेऱ्यांना चाप बसावा, यासाठी सर्व टँकरला जीपीएस सिस्टिम बसवण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

ठळक मुद्देपाण्याच्या टॅँकरवर जीपीएस यंत्रणा बसणार का?टँकरमालकांच्या खेळीमुळे जनतेचे पाण्यावाचून हाल

जत : जत तालुक्यात दिवसेंदिवस तीव्र उन्हाळ्याचे चटके जाणवू लागले आहेत. प्रशासनाने टंचाईग्रस्त गावात उपाययोजना सुरू केल्या आहेत. तालुक्यातील ९३ गावे व त्याखालील ६७२ वाड्या-वस्त्यांवर १०९ टँकरव्दारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू आहे. अशावेळी बोगस फेऱ्यांना चाप बसावा, यासाठी सर्व टँकरला जीपीएस सिस्टिम बसवण्यात यावी, अशी मागणी होत आहे.तालुक्यात मोठ्याप्रमाणात टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे. परंतु मंजूर खेपांनुसार पाणी पुरवठा होत नाही. प्रत्यक्षात कमी खेपा टाकल्या जात आहेत. बिले मात्र सर्व खेपांची काढली जात आहेत. जनतेची व शासनाची फसवणूक करून टँकर मालक गब्बर होताना दिसत आहेत. टँकरमालकांच्या या खेळीमुळे जनतेचे पाण्यावाचून हाल होत आहेत.जीपीएस यंत्रणा बसवल्यावर खासगी टँकरमालकांना पाण्याची चोरी अथवा अतिरिक्त फेऱ्या शासन दप्तरी दाखविता येणार नाहीत. त्यामुळे १०९ टँकरवर जीपीएस यंत्रणा कार्यान्वित करावी, अशी मागणी होत आहे.पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्याकडे टँकरच्या हालचालींची नोंद जीपीएसच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. यासाठी विशेष कक्ष पंचायत समिती स्तरावर उभारण्याची गरज आहे. पाण्याचे टँकर वाडी-वस्तीवर किंवा मागणी असलेल्या ठिकाणी पोहोचत नाहीत, अशा तक्रारी होत आहेत.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईSangliसांगली