कुपवाडमध्ये पतीच्या मारहाणीतील जखमी पत्नीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:34 IST2021-04-30T04:34:39+5:302021-04-30T04:34:39+5:30

कुपवाड : शहरातील अहिल्यानगर येथील कोमल राहुल जाधव (वय २१) हिला पतीने ‘स्वयंपाक का केला नाहीस’, असे म्हणून बॅटने ...

Wife dies after being beaten by husband in Kupwad | कुपवाडमध्ये पतीच्या मारहाणीतील जखमी पत्नीचा मृत्यू

कुपवाडमध्ये पतीच्या मारहाणीतील जखमी पत्नीचा मृत्यू

कुपवाड : शहरातील अहिल्यानगर येथील कोमल राहुल जाधव (वय २१) हिला पतीने ‘स्वयंपाक का केला नाहीस’, असे म्हणून बॅटने बेदम मारहाण केली होती. तिच्यावर सांगलीतील वसंतदादा रुग्णालयात उपचार सुरू असतानाच बुधवारी रात्री उशिरा तिचा मृत्यू झाला. कुपवाड पोलिसांनी संशयित राहुल बाळासाहेब जाधव (२८) याला गुरुवारी सकाळी अटक केली आहे.

संशयित राहुल जाधव याने मंगळवारी संध्याकाळी पत्नी कोमल हिला स्वयंपाक करण्याच्या कारणातून शिवीगाळ करत बॅटने बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत कोमल गंभीर जखमी झाली होती. नातेवाइकांनी तिला वसंतदादा रुग्णालयात दाखल केले होते. तिच्यावर उपचार सुरू असतानाच बुधवारी रात्री उशिरा तिचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद कुपवाड पोलीस ठाण्यात झाली आहे. कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी संशयित राहुल जाधव यास अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संशयित राहुल जाधव याने मंगळवारी संध्याकाळी पत्नी कोमल हिला " तू स्वयंपाक का केला नाहीस. मला भूक लागली आहे", असे म्हणून शिवीगाळ केली होती.“ त्यानंतर त्याने तुला जिवंत ठेवत नाही", असे म्हणून पत्नीस बॅटने बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत कोमल गंभीर जखमी झाली होती. नातेवाइकांनी तिला वसंतदादा रुग्णालयात दाखल केले होते. तिच्यावर उपचार सुरू असतानाच बुधवारी रात्री उशिरा तिचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद कुपवाड पोलीस ठाण्यात झाली आहे. कुपवाड एमआयडीसी पोलिसांनी कोमल हिच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या संशयित राहुल जाधव यास अटक केली आहे.

Web Title: Wife dies after being beaten by husband in Kupwad