लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : खोतवाडी-बिसूर-बुधगाव या रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामास सोमवारी सुरुवात झाली. भाजपचे आ. सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते कामास प्रारंभ झाला.
खोतवाडी, बिसूर, बुधगाव या ठिकाणच्या नागरिकांची गेल्या अनेक वर्षांपासून रस्ता रुंदीकरणाची मागणी होती. या मागणीनुसार तसेच रस्त्यावरील वाहतुकीची वर्दळ वाढल्याने राज्याच्या बजेटमधून २ कोटी ३० लाख रु.चा निधी आमदार गाडगीळ यांनी मंजूर करून आणला. सोमवारी या रस्त्याचा बुधगाव, बिसूर, खोतवाडी येथे प्रारंभ करण्यात आला. यावेळी गावातील नागरिकांनी वचनपूर्तीनुसार रस्ता मंजूर करून आणल्याबद्दल नागरिकांनी आमदार गाडगीळ यांचा नागरी सत्कार करण्यात आला.
यावेळी बाळासाहेब पाटील, संदीप गोसावी, अशरफ वांकर, विक्रम पाटील, जयवंत पाटील, राजेंद्र शिवकाले, सुखदेव गोसावी, दिलीप तारळेकर, विनायक शिंदे, विवेक लुगडे, धनाजी पाटील, प्रकाश गोसावी, विकास पाटील, अविनाश पाटील, श्रीकांत पाटील, वैभव पाटील, उत्तम सुतार, शुभांगी कोली, अश्विनी म्हेत्रे, स्नेहल वहनुगरे, वैशाली शिंदे, आदी उपस्थित होते.
चौकट
आठ किलोमीटरचा रस्ता
खोतवाडी-बिसूर-बुधगाव हा सुमारे ८ किलोमीटरचा रस्ता आहे. या कामानंतर रस्त्याची रुंदी चार ते साडेचार फुटाने वाढणार आहे. त्यामुळे वाहनांच्या कोंडीचा प्रश्न निकाली निघणार आहे.