शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीतील पाणी प्रश्नावर पालकमंत्री, आमदार गप्प का?, ३ मार्चला ठिय्या आंदोलन

By अविनाश कोळी | Updated: February 26, 2024 18:52 IST

सर्वपक्षीय कृती समितीचा सवाल 

सांगली : कृष्णा नदी कोरडी पडत असून सांगली, कुपवाडमधील नागरिकांचे अपुऱ्या व दूषीत पाण्यामुळे हाल होत आहेत. पाण्याचा एवढा गंभीर प्रश्न निर्माण झाल्यानंतरही पालकमंत्री, आमदार, खासदार गप्प कसे बसू शकतात, असा सवाल सर्वपक्षीय कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला. याप्रश्नी तोडगा निघाला नाही, तर येत्या ३ मार्चला पालकमंत्री व आमदारांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन करण्याचा इशाराही समितीने दिला.सांगलीच्या ‘कष्टकऱ्यांची दौलत’ सभागृहात सोमवारी सर्वपक्षीय कृती समितीची बैठक पार पडली. निमंत्रक सतीश साखळकर म्हणाले की, गेले काही दिवस महापालिका क्षेत्रात गढुळ, दूषित व अळीमिश्रित पाणीपुरवठा होत आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असताना गेंड्याची कातडी असलेल्या प्रशासनावर याचा काहीही परिणाम होताना दिसत नाही.नगरसेवकांची कारकीर्द संपली म्हणून त्यांची जबाबदारी संपली नाही. येणाऱ्या निवडणुकीमध्ये पुन्हा हे नगरसेवक निवडणुकीस सामोरे जाणार नाहीत का? प्रशासन, आमदार, खासदार आणि स्थानिक लोकप्रतिनिधी, विरोधी पक्ष पाणी प्रश्नावर गप्प का आहेत, असा सवाल पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला.सांगली शहराच्या निम्म्या भागास ७० एम. एल. डी प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो तो शुद्ध व पुरेसाा आहे. अर्ध्या शहरास ५६ एम.एल.डीमधून पाणीपुरवठा केला जातो. हा प्रकल्प कालबाह्य झाल्याने दूषीत पाणीपुरवठा होत आहे, अशी माहिती साखळकर यांनी दिली.

कोयना धरणातून कृष्णा नदीत सांगली जिल्ह्याच्या हक्काचे पाणी सोडण्यासाठी वारंवार सातारा पाटबंधारे मंडळ व साताऱ्याचे पालकमंत्री शंभुराजे देसाई यांच्याशी पत्रव्यवहार करावा लागत आहे. धरणातील हक्काच्या पाण्याबाबत योग्य ते धोरण ठरवण्यात यावे, अन्यथा येत्या ३ मार्चला जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे व आमदार सुधीर गाडगीळ यांच्या घरासमोर धरणे आंदोलन करु, असा इशारा देण्यात आला.बैठकीस माजी आमदार नितीन शिंदे, माजी नगरसेवक जगन्नाथ ठोकळे, पद्माकर जगदाळे, सागर घोडके, हणमंतराव पवार, अशफाक शेख, विश्वजित पाटील, अंकुश केरीपाळे, विजय जाधव, गजानन साळुंखे, उमेश देशमुख, मिलिंद सावंत, किरणराज कांबळे, संजय पिराळे, किशोर जगदाळे, शिवाजीराव सावंत, रेखा पाटील, डॉ. संजय पाटील, संजय चव्हाण, संदीप दळवी, ऋषिकेश पाटील, दिलीप माळी, शुभम पाटील, अजित काशीद, मुस्तफा मुजावर, रुपेश मोकाशी, निलेश पवार आदी उपस्थित होते.

टॅग्स :SangliसांगलीWaterपाणी