शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

सांगली शिक्षक बँकेच्या थकबाकीदारांवर कारवाईची हिंमत का दाखवत नाही?- यु. टी. जाधव 

By अशोक डोंबाळे | Updated: May 21, 2024 15:45 IST

दोन वर्षांतील अपयश झाकण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न

सांगली : जिल्हा प्राथमिक शिक्षकबँकेत सत्ताधारी दोन वर्षांत कामाचा ठसा उमटविण्यात अपयशी ठरल्याने सारखेच शिळ्या कढीला ऊत आणण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. सोलापूरचे १८८ सभासद थकबाकीदार असतील तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची हिंमत का दाखवत नाहीत?, असे विरोधकांना सडेतोड उत्तर शिक्षकबँकचे माजी अध्यक्ष यु. टी. जाधव यांनी दिले. तसेच सोलापूरमध्ये तुम्ही सभासद वाढविले कशासाठी, असा सवालही त्यांनी केला.सोलापूरच्या १८८ कर्जदारांकडे १६ कोटींचे व्याज थकीत आहे. हे थकबाकीदार शिक्षक समितीच्या कालावधीतील आहेत. यामुळे बँकेचा दोन कोटी रुपयांनी नफा कमी झाला आहे, अशी टीका शिक्षक बँकेचे अध्यक्ष विनायक शिंदे यांनी केली होती. या टीकेला प्रत्त्युत्तर देतांना यु. टी. जाधव बोलत होते. ते म्हणाले, जिल्ह्याबाहेरील सभासदांचा अनुभव वाईट असेल तर सातारा जिल्ह्यातील सभासद वाढविण्याचा खटाटोप कशासाठी करत आहे. बक्षिस व बोनस पगार बंद केला, म्हणणारांनी कर्मचाऱ्यांना वेतनवाढी देऊन नफ्याला कात्री लावली आहे. दोन लाख रुपये घेऊन पदोन्नती कशासाठी दिली? नोकरभरती बंद म्हणणाऱ्यांनी नवीन कर्मचारी का भरले? समितीच्या काळात झालेला नफा सभासदांना देण्याऐवजी इमारत व जागा खरेदीकडे का वळवला? याची उत्तरे सत्ताधाऱ्यांनी सभासदांना देण्याची गरज आहे. सभासदांना लाभांश देताना त्यांच्या रोषाला सामोरे जावे लागणार आहे. याची कुणकुण लागल्याने आतापासूनच रडगाणे सत्ताधाऱ्यांनी सुरू केले आहे. शिवाय इतर संचालकांना नोकरभरतीच्या मानसिक गुलामगिरीत अडकवून सत्तेचा मलिदा केवळ दोघे ते तिघेच चाखत आहेत. सध्याचे सत्ताधारी संचालक मंडळ ठेवीदारांचे हित बघणारे की कर्जदार सभासदांचे शोषण करणारे आहे हेच कळत नाही. कारण ठेवीचे व्याजदर वाढविले, म्हणता मग कर्जाचे व्याजदर कमी का केले नाही? केवळ निवडून येईपर्यंत ढोल बडवले व सहा महिन्यांतच दिलेले एक अंकी कर्जव्याजदराचे आश्वासन हवेत विरले.यावेळी शिक्षक समितीचे नेते सयाजीराव पाटील, पार्लमेंटरी बोर्ड अध्यक्ष सदाशिव पाटील, सचिव शशिकांत बजबळे, जिल्हाध्यक्ष माणिक पाटील, सरचिटणीस हरिभाऊ गावडे आदी उपस्थित होते.

विनायक शिंदे स्वत:च्या तालुक्यातच अपयशीथकबाकीदारांची वसुली करण्यासाठी नियोजनाचा अभाव आहे. गैरकारभार थांबवण्याऐवजी स्वतःचीच पाठ स्वतः थोपटणे सत्ताधाऱ्यांनी बंद केले पाहिजे. पंढरपूर व उमदी नवीन शाखा काढूनही थकबाकी कमी कशी झाली नाही. उमदी शाखेत ११९ थकबाकीदार म्हणजेच बँकेचे अध्यक्ष विनायक शिंदे स्वतःच्या तालुक्यातच अपयशी ठरले आहेत, अशी टीकाही जाधव यांनी केली.

टॅग्स :SangliसांगलीTeacherशिक्षकbankबँक