शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

पलूस, इस्लामपूर, तासगाव बाजार समित्यांना अभय का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2020 15:40 IST

सांगली बाजार समिती संचालक मंडळाचा कार्यकाल संपल्यानंतर प्रभारी सहकारमंत्र्यांनी तात्काळ प्रशासकांची नियुक्ती केली. हीच तत्परता त्यांनी तासगाव, इस्लामपूर, पलूस बाजार समिती संचालकांची मुदत संपल्यानंतर का दाखविली नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

ठळक मुद्देउपनिबंधकांच्या अहवालाकडे दुर्लक्ष सांगलीचे संचालक राजकारणाचा बळी

अशोक डोंबाळे सांगली : सांगली बाजार समिती संचालक मंडळाचा कार्यकाल संपल्यानंतर प्रभारी सहकारमंत्र्यांनी तात्काळ प्रशासकांची नियुक्ती केली. हीच तत्परता त्यांनी तासगाव, इस्लामपूर, पलूस बाजार समिती संचालकांची मुदत संपल्यानंतर का दाखविली नाही, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. सांगलीला खमक्या राजकीय नेतृत्व नसल्याची पोकळी याला कारणीभूत आहे का, असा सवाल मदन पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे.सांगली बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत दि. २६ आॅगस्टरोजी संपल्यानंतर दि. २७ रोजी लगेच प्रशासक नियुक्ती केली आहे. कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, आमदार विक्रम सावंत यांनी प्रभारी सहकारमंत्री जयंत पाटील यांच्याकडे मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. तरीही ती त्यांनी फेटाळून लावली.

या निर्णयाचे सर्वांनी स्वागत केले. पण, पलूस बाजार समिती संचालक मंडळाची मुदत संपून महिना झाला तरीही तेथे प्रशासक का नियुक्त केला नाही, अशी चर्चा आहे. तेथे विश्वजित कदम गटाची सत्ता आहे. पलूस बाजार समितीत कदम यांचा शब्द मानला जातो आणि सांगली बाजार समितीत का डावलले, असा सवाल मदन पाटील गटाच्या कार्यकर्त्यांनी केला.तासगाव बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत २७ आॅगस्टलाच संपली आहे. तेथे राष्ट्रवादीची सत्ता आहे. तेथील घोटाळ्याच्या चौकशीनंतर जिल्हा उपनिबंधकांनी तासगाव बाजार समिती संचालक मंडळाला मुदतवाढ देऊ नये, अशी शिफारस राज्य सरकारकडे केली आहे. तरीही त्यांना अभय दिले आहे. सांगली बाजार समितीबरोबरच मुदत संपली असतानाही, तासगाव बाजार समितीवर प्रशासक का नियुक्त केला नाही, असा प्रश्न सांगली बाजार समितीच्या संचालकांनी उपस्थित केला आहे.इस्लामपूर बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत २५ आॅगस्टरोजी संपली आहे. तेथेही प्रशासक नियुक्त केला नाही. तेथे जयंत पाटील गटाची सत्ता आहे. त्यांनी प्रशासक नियुक्त करताना दुजाभाव केल्याचे बोलले जात आहे.पक्षप्रवेश न केल्याची शिक्षासांगली बाजार समितीमध्ये सभापतीपद काँग्रेसचे नेते माजी मंत्री मदन पाटील यांच्या पत्नी जयश्रीताई पाटील यांच्या गटाकडे होते. जयश्रीताई यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला होता. पण, काँग्रेस नेत्यांनी नाराजी दूर केल्यामुळे त्यांचा राष्ट्रवादी प्रवेश थांबला आहे. बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील आणि काही संचालकांनाही राष्ट्रवादीची आॅफर होती. परंतु पाटील व अन्य संचालकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला नाही. राष्ट्रवादीत प्रवेश न झाल्यामुळेच सांगली बाजार समितीवर प्रशासक नियुक्त झाल्याचा आरोप केला जात आहे.

टॅग्स :PoliticsराजकारणMarket Yardमार्केट यार्डSangliसांगली