शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
2
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
3
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
4
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
5
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
6
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
7
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
8
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
9
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
10
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
11
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
12
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
13
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
14
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
15
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
16
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
17
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
18
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
19
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
20
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले

सवलत दिलेली आली अंगलट, सांगलीत बिल्डरांच्या घशात कोट्यवधीचा एलबीटी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 17:55 IST

महापालिका निद्रावस्थेत 

सांगली : राज्य शासनाने नुकताच महापालिकांमधील एलबीटी विभाग बंद केला. मात्र, सांगली-मिरज-कुपवाड महापालिका क्षेत्रातील बिल्डरांकडे अडकलेली कोट्यवधी रुपयांची एलबीटी आता वसूल करणार कोण, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. बांधकाम परिपूर्तता प्रमाणपत्रावेळी एलबीटीची शंभर टक्के रक्कम भरण्याचे मान्य करून अनेक बिल्डरांनी कोट्यवधी रुपयांचा कर बुडविला आहे.शासनाने २०१३ मध्ये जकात बंद करून एलबीटी लागू केला. पुढे दि. १ जुलै २०१७ पासून जीएसटीमुळे तो रद्द झाला. एलबीटी कालावधीत बांधकाम परवाना देताना बांधकाम साहित्यापोटी ५० टक्के एलबीटी भरून घेऊनच महापालिका बांधकाम परवाना देत होती. त्यानंतर परिपूर्तता प्रमाणपत्र देताना उर्वरित ५० टक्के एलबीटी वसूल करण्याची पद्धत ठेवली होती.सामान्य नागरिकांनी या पद्धतीनेच एलबीटी भरली; मात्र महापालिका क्षेत्रातील अनेक मोठे अपार्टमेंट्स, व्यापारी संकुले यांना २०१३ पासून एलबीटी बंद होईपर्यंत परिपूर्तता प्रमाणपत्र देतानाच शंभर टक्के एलबीटी भरण्याची सवलत दिली गेली. माहिती अधिकार कार्यकर्ते रामचंद्र जाधव यांनी २०१८ मध्ये याबाबतची माहिती महापालिकेकडे मागितली होती. केवळ शंभर रुपयांच्या स्टॅम्पद्वारे अनेक बिल्डरांना एलबीटी कालांतराने भरण्यास परवानी दिली होती. नंतर ही एलबीटी वसूलच झाली नाही. त्यामुळे महापालिकेचे कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याची बाब समोर आली.अधिकारीही तितकेच जबाबदारबिल्डरधार्जिण्या काही अधिकाऱ्यांनी महापालिकेची फसवणूक केली आहे. काही बिल्डरांनी ५० टक्के तर काहींनी १०० टक्के एलबीटी न भरता त्याठिकाणचा रहिवास वापर सुरू केला आहे.

एकाही आयुक्तांकडून धाडस नाहीमहापालिकेकडे असे स्टॅम्प पेपर रेकॉर्डला आहेत. त्यांची माहिती काढून कोट्यवधी रुपयांची एलबीटी वसूल करण्याची मागणीही करण्यात आली होती. कोणत्याही आयुक्तांनी महापालिकेचा बुडालेला हा महसूल वसूल करण्याचे धाडस दाखविले नाही.

नागरिकांकडून वसुली झालीबिल्डरांकडून ज्यांनी घरे घेतली त्यांच्याकडून बिल्डरांनी एलबीटीसहित घराची किंमत वसूल केली. मात्र, महापालिकेकडे त्याचा भरणा केला नाही. दुसरीकडे बांधकाम परवाना घेताना एलबीटी भरण्याचा नियम सामान्य लोकांनी पाळला. मात्र, बिल्डरांवर कृपादृष्टी दाखवित करबुडवेगिरीला काही अधिकाऱ्यांनी प्रोत्साहन दिले.

विभाग बंद, पुढे काय?राज्य शासनाने एलबीटी विभाग बंद करण्याचे आदेश दिले आहेत, मात्र थकीत एलबीटी वसूल करू नये, असे आदेश कधीच दिले नाहीत. तरीही वसुली होत नसल्याने अधिकाऱ्यांबाबत संशय व्यक्त होत आहे.

टॅग्स :Sangliसांगली