शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
2
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
3
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
4
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
5
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
6
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
7
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
8
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
9
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
10
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
11
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
12
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
13
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
14
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
15
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
16
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
17
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
18
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
19
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
20
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवार आता भूकंप करू शकत नाहीत - केंद्रीय मंत्री नारायण राणे

By शीतल पाटील | Updated: April 21, 2023 18:13 IST

अजित पवार भाजपच्या निकषात बसले पाहिजेत

सांगली : ‘कोण संजय राऊत? मी त्यांना ओळखत नाही’, असे सांगत केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी अब्रुनुकसानीच्या दाव्याबाबत फटकारले. ‘भांडूपच्या सभेत मी तसे काही बोललोच नाही’, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले. त्यामुळे राऊत-राणे वाद आणखी पेटण्याची चिन्हे आहेत.केंद्रीय मंत्री राणे शुक्रवारी सांगली दौऱ्यावर होते. शिवसेनेत असताना संजय राऊत यांना निवडून आणण्यासाठी खर्च केल्याचे वक्तव्य त्यांनी भांडूपच्या सभेत केले होते. या वक्तव्याविरोधात राऊत यांनी मुलुंड न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. याबाबत राणे म्हणाले की, कोण आहे संजय राऊत? मी ओळखत नाही. भांडूपच्या सभेत मी असे बोललोच नाही.ते म्हणाले की, मराठा आरक्षणाबाबत तज्ज्ञांशी चर्चा करणार आहोत. त्यानंतर पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाऊ. शरद पवार आता भूकंप करू शकत नाहीत. राज्यातील शिंदे-भाजपचे सरकार भक्कम आहे. ते पाच वर्षे टिकेल. राज्यातील सरकार चांगले काम करीत आहे.लोकसभेच्या २०२४ मधील निवडणुकीत भाजपने ४०३ जागा जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. माझ्याकडे दक्षिण गोवा, दक्षिण मुंबई व सांगली लोकसभेची जबाबदारी आहे. गतवेळेपेक्षा सांगलीचा खासदार तीन लाख मतांनी विजयी होईल. एकसंघ व एक विचाराने भाजप निवडणुकीला सामोरे जाणार आहे. गेल्या नऊ वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतलेले निर्णय, विविध योजना, भाजपचे कार्य जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम कार्यकर्ते करणार आहेत. २०३० पर्यंत भारताला महासत्ता बनविण्याचे स्वप्न आहे. त्यासाठी तिसऱ्यांदा मोदींना पंतप्रधान करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. महाराष्ट्रात लोकसभेच्या ४६, तर विधानसभेच्या १९० जागा भाजप जिंकेल, असा दावाही त्यांनी केला.सांगली जिल्ह्यातील शेतीमाल, उपपदार्थ निर्यात व्हावे, यासाठी मी प्रयत्न करणार आहे. सांगलीचा बेदाणा व विमानतळाबाबत भाजपच्या बैठकीत चर्चा झाली आहे. या दोन्हीबाबत लवकरच मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचे राणे यांनी सांगितले.अजित पवारांची भेट नाहीअजित पवार यांच्या राजकीय हालचालीबाबत राणे म्हणाले की, काही महिन्यांपासून त्यांची भेट झालेली नाही. दूरध्वनी झाला नाही. त्यामुळे त्यांच्या मनात काय चालले आहे, हे माहीत नाही. त्यांना भाजपमध्ये प्रवेश द्यायचा की नाही, हे वरिष्ठ नेते बघतील, तपासून घेतील. तेही भाजपच्या निकषात बसले पाहिजेत.

टॅग्स :SangliसांगलीSanjay Rautसंजय राऊतNarayan Raneनारायण राणे