शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत दुसरा उड्डाणपूल, वनवास आणखी वाढणार?

By अविनाश कोळी | Updated: May 17, 2024 16:18 IST

‘एमआरआयडीसी’मार्फत डेपो उभारणी

अविनाश कोळीसांगली : माधवनगर रोडवरील चिंतामणीनगर येथील रेल्वे उड्डाणपुलाचे काम मंदगतीने सुरू असतानाच आता महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट काॅर्पोरेशनमार्फत पंचशीलनगर रेल्वे उड्डाणपूल उभारणीची तयारी केली जात आहे. याठिकाणी मार्किंगच्या कामास सुरुवात झाली असून, महामंडळाने कामासाठी येथे डेपोही उभारला आहे.जुना बुधगाव रोडवरील पंचशीलनगर येथील रेल्वे फाटक क्रॉसिंग नंबर १२९वर हा उड्डाणपूल होणार आहे. केंद्र शासनाच्या ‘सेतू भारतम्’ या योजनेंतर्गत गडकरी यांना या पुलाचा प्रस्ताव दोन वर्षापूर्वी दिला होता. २६ मार्च २०२२ रोजी सांगली दौऱ्यावेळी गडकरी यांनी या प्रस्तावास मान्यता दिली होती. त्यानंतर महाराष्ट्रातील नऊ उड्डाणपुलांच्या कामांत सांगलीच्या या कामाचा समावेश करण्यात आला. ३ जून २०२३ मध्ये पुण्यात व्हर्च्युअल पद्धतीने या कामाचे भूमिपूजन झाले होते.चिंतामणीनगर रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू झाल्यानंतर पर्यायी रस्ता म्हणून जुना बुधगाव रस्त्याचा वापर सुरू झाल्याने येथील उड्डाणपुलाचे काम थांबविले होते. चिंतामणीनगर रेल्वे उड्डाणपुलाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. ते कधी पूर्ण होईल, याची खात्रीशीर माहिती कोणालाही नाही. अशा स्थितीत आता पर्यायी जुना बुधगाव रस्त्यावरील रेल्वे उड्डाणपुलाच्या कामाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

काम कधी सुरू होणार?पंचशीलनगर येथील उड्डाणपुलाचे काम कधी सुरू होणार याबाबतची माहिती मिळविण्यासाठी महाराष्ट्र रेल्वे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट काॅर्पोरेशनशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून कोणतीही माहिती देण्यात आली नाही.

..तर प्रवाशांचा वनवास वाढेलचिंतामणीनगर रेल्वे उड्डाणपूल बंद असतानाच पंचशीलनगरच्या पुलाचे काम सुरू झाले तर प्रवाशांना गावाला वळसा घालून प्रवास करावा लागेल. त्यांचा वनवास आणखी खडतर होण्याची भीती व्यक्त होत आहे.

मार्किंगला सुरुवातमहामंडळाने गुरुवारी जुना बुधगाव रस्त्याच्या दक्षिण बाजूने मार्किंगला सुरुवात झाली. पुलाची सुरुवात जिथून होते तिथून आखणी करण्यात आली आहे. याशिवाय महामंडळाने याठिकाणी डेपोही उभारला आहे.

७० कोटी रुपये मंजूरया उड्डाणपुलासाठी अंदाजे ७० कोटी रुपये खर्च होणार आहे. तितक्या खर्चाला मंजुरी मिळाली आहे. सांगली ते माधवनगरसाठी मोठा पर्यायी रस्ता उपलब्ध होणार आहे. पुराच्या काळातही या रस्त्याची मदत होईल.

टॅग्स :Sangliसांगलीrailwayरेल्वे