शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

कुठे घ्यावे उपचार? ‘खासगी’ची दारे बंद!; विमा योजना : २०० कोटी अडकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2023 08:14 IST

धोकादायक इमारती, असुविधा, सेवेतील दिरंगाई अशा अनेक कारणांनी राज्य कामगार विमा रुग्णालयांकडे जाणाऱ्या कामगारांची संख्या कमी होत आहे.

- अविनाश कोळीलोकमत न्यूज नेटवर्कसांगली : केंद्र व राज्य शासनामार्फत चालविल्या जाणाऱ्या राज्य कामगार विमा योजनेच्या (ई.एस.आय.) अडचणी कमी होण्याऐवजी वाढतच आहेत. गेल्या दीड वर्षापासून ही योजना चालविणाऱ्या महाराष्ट्रातील १३३ रुग्णालयांचा परतावा शासनाने दिला नसल्याने खासगी रुग्णालयांनी आता या योजनेतील उपचाराबाबत असमर्थता दर्शविली आहे. त्यामुळे कामगारांसाठी मोठा आधार बनलेल्या खासगी रुग्णालयांचे दार कामगारांसाठी बंद होत आहे.

 धोकादायक इमारती, असुविधा, सेवेतील दिरंगाई अशा अनेक कारणांनी राज्य कामगार विमा रुग्णालयांकडे जाणाऱ्या कामगारांची संख्या कमी होत आहे. राज्यातील १३३ खासगी रुग्णालयांमध्येसुद्धा ही योजना सुरू आहे. कामगारांना खासगी रुग्णालयेच बरी वाटतात. मात्र, दीड वर्षापासून शासनाने त्यांचा परतावाच दिला नाही. खासगी रुग्णालयांचे सुमारे २०० कोटी रुपये महामंडळाकडे अडकले आहेत. केंद्र व राज्य शासनाच्या सर्व सेवा ऑनलाइन झाल्या असताना कामगार विमा योजना आजही ऑफलाइन पद्धतीने चालविली जाते. 

दरवर्षी जमा होतात १३०० कोटी रुपयेराज्य कामगार विमा योजनेंतर्गत राज्यातून दरवर्षी सुमारे १ हजार ३०० कोटी रुपये जमा होतात. मालक व कामगार यांचा यासाठी संयुक्त हिस्सा जातो. राज्यभरात १४ कामगार विमा रुग्णालये व त्याठिकाणी तीन हजार खाटा राखीव आहेत. सद्य:स्थितीत २४ लाखांवर कामगारांची नोंदणी आहे.

बंदचे लागले फलक मिरजेतील एका मोठ्या रुग्णालयाने कामगार विमा योजना येत्या १८ ऑक्टोबरपासून बंद करणार असल्याचा फलक लावला आहे.

दोन रुग्णालयांचाच सात कोटी परतावा शासनाकडे अडकला. नाईलाने कामगार विमा योजनेची सेवा बंद करीत आहोत.    - डॉ. रविकांत पाटील, मिरज

ज्या रुग्णालयांचे पैसे थकीत आहेत त्यांनी आमच्याकडे यादी द्यावी. आम्ही ई.एस.आय.सी.कडून ते पैसे मागवून घेऊ. कामगारांसाठीची सेवा रुग्णालयांनी बंद करू नये.    - सुरेश खाडे, कामगारमंत्री