सांगली : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभागाच्यावतीने आता लालपरीला व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीमचा आधार दिला जात आहे. यामुळे प्रवाशांना घरबसल्या एस. टी. बसचे लाेकेशन पाहता येणार आहे. स्वातंत्र्यदिनी याचा लाेकार्पण साेहळा हाेणार हाेता, मात्र ताे मुहूर्त आता लांबणीवर पडला आहे. सध्या सांगली विभागातील ७१८ बसेसना ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. नवीन यंत्रणेव्दारे बस कुठे थांबली? किती वेगाने येत आहे? याची माहिती अधिकारी, कर्मचाऱ्यांना कार्यालयात बसून सध्या मिळत आहे. प्रवाशांसाठी मात्र हे ॲप खुले केलेले नाही.
चौकट
बस कुठे आहे हे आधीच कळणार...
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभागाच्यावतीने व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीम बसविण्यात आल्याने प्रवाशांना आता आपल्या माेबाईल स्क्रिनवर बस कुठे आहे, कुठल्या मार्गावर आहे, याचे संपूर्ण लाेकेशन क्षणात पाहता येणार आहे. बस कुठल्या थांब्यावर किती वेळ थांबली आहे, हेही पाहता येणार आहे.
चौकट
स्वातंत्र्यदिनाचा हुकला लाॅचिंगचा मुहूर्त...
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन विभागाच्यावतीने या ॲपचे लाॅचिंग हाेणार हाेते. त्यासाठी १५ ऑगस्टचा मुहूर्तही ठरला हाेता. या मुहुर्तावर ॲपचे लाॅचिंग झाले नाही. सध्या हा मुहूर्त लांबणीवर पडला आहे. सांगली जिल्ह्यातील दहा आगारांतील ७१८ बसेसना हे ॲप बसविले आहे. त्याचा बसस्थानकातील अधिकारी, कर्मचारी वापर करत आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी ॲप खुले केलेले नाही. राज्यातील काही बसेसना हे ॲप बसविलेले नाही, त्यामुळे ते सुरु केलेले नाही. राज्यात एकाचवेळी ॲप सुरु करणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
चौकट
लाेकेशन यंत्रणा सुरु...
सांगली विभागात एकूण ७१८ बसेस आहेत. या सर्वच बसेसना व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीम बसविण्यात आली आहे. यामध्ये सांगली, मिरज, कवठेमहांकाळ, जत, आटपाडी, तासगाव, विटा, पलूस, इस्लामपूर, शिराळा या आगारांमधील बसेसचा समावेश आहे. राज्यस्तरावरील लाेकार्पण साेहळा काही कारणास्तव रद्द झाला असला तरी राज्यात एकाचवेळी हे ॲप सुुरु होणार आहे. म्हणूनच सांगलीचेही ॲप सुरु तरी लातुरात मात्र ही यंत्रणा सुरु झाली आहे.
- अरुण वाघाटे, विभाग नियंत्रक, सांगली.
चौकट
जिल्ह्यातील आगारनिहाय बसेस
सांगली १०२
मिरज ९७
इस्लामपूर ७६
तासगाव ६९
विटा ५८
जत ७३
कवठेमहांकाळ ५३
शिराळा ५५
पलूस ५०
विभाग ४९
एकूण ७१८