शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णांसाठी मोफत लॅबचे काम रेंगाळले, जागेविना घोडे अडले; सांगली शासकीय रुग्णालयातील प्रकल्प सत्यात उतरणार कधी?

By अविनाश कोळी | Updated: November 29, 2023 16:40 IST

अविनाश कोळी सांगली : शासकीय रुग्णालयात पीपीपी (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) तत्त्वावर रेडिओलॉजी प्रकल्प सुरू करण्यासाठी आदेश देऊन सव्वा वर्षाचा ...

अविनाश कोळीसांगली : शासकीय रुग्णालयात पीपीपी (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) तत्त्वावर रेडिओलॉजी प्रकल्प सुरू करण्यासाठी आदेश देऊन सव्वा वर्षाचा कालावधी उलटला तरी अद्याप सांगलीत नियुक्त कंपनीला जागा मिळू शकली नाही. गरीब रुग्णांना महागड्या चाचण्या मोफत मिळण्यासाठी या प्रकल्पाची आखणी करूनही सांगली जिल्ह्यात केवळ जागेची चाचपणीच सुरू आहे.रेडिओलॉजी प्रकल्पासाठी कृष्णा डायग्नोस्टिक लि. या कंपनीची नियुक्ती आरोग्य विभागाने केली आहे. या कंपनीमार्फत सांगली, पालघर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, औरंगाबाद, उस्मानाबाद, वाशिम, सोलापूर, ठाणे, रायगड, कोल्हापूर, नाशिक, लातूर आदी जिल्ह्यांत ठिकठिकाणी या प्रकल्पाला मंजुरी दिली होती. काही ठिकाणी या प्रकल्पाला मुहूर्त लागला; मात्र सांगली जिल्ह्यासाठी मात्र या प्रकल्पाला अजूनही प्रतीक्षा करावी लागत आहे. संबंधित कंपनीला जागा उपलब्ध करून देण्यात अद्याप जिल्ह्याला यश मिळालेले नाही.

काय आहे प्रकल्प?नियुक्त कंपनीमार्फत सीटी स्कॅन, एक्स-रे यासह पॅथालॉजी लॅब उघडली जाईल. या ठिकाणी रुग्णांची मोफत तपासणी केली जाईल. कंपनीला त्यांच्या खर्चाची रक्कम शासनामार्फत दिली जाणार आहे.

कार्यादेश देऊनही विलंबसंबंधित कंपनीला शासनाच्या आरोग्य विभागाने १८ जुलै २०२२ रोजी कार्यादेश दिला होता. आदेश देऊनही सव्वा वर्षाचा काळ लोटला तरी हा प्रकल्प सांगलीत अस्तित्वात आलेला नाही. तरीही हा प्रकल्प अद्याप जिवंत आहे.

आज बैठक होणारया प्रकल्पाच्या जागेबाबत चर्चा करण्यासाठी २९ नोव्हेंबर रोजी सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक होणार आहे. या बैठकीत जागेबाबत सकारात्मक निर्णय व्हावा, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

कंपनीकडून सांगलीत पाहणीनियुक्त कंपनीने या प्रकल्पाची उभारणी करण्यासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयास भेट देऊन या ठिकाणी पाहणी केली. थ्री फेज वीज कनेक्शन व जागा उपलब्धतेबाबत त्यांनी पाहणी केली. याबाबत निर्णय लवकर घेतल्यास करार करून कंपनी तातडीने हा प्रकल्प सांगलीत सुरू करण्याची तयारी करीत आहे.

शासनाने प्रकल्प मंजूर करूनही तो जर जागेसाठी रेंगाळत असेल तर हा प्रकार योग्य नाही. रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना या प्रकल्पातून दिलासा मिळणार आहे. त्यामुळे त्याची तातडीने अंमलबजावणी करावी. - सतीश साखळकर, अध्यक्ष, नागरिक जागृती मंच

टॅग्स :Sangliसांगलीhospitalहॉस्पिटल