शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा अनर्थ टळला! AK 47 ते ३०० किलो RDX जप्त; डॉक्टरच्या मुखवट्यात लपला होता क्रूर दहशतवादी
2
पार्थ पवार ते ७० हजार कोटी; दोन मोठ्या आरोपांवर अजितदादांचे उत्तर; म्हणाले, "सकाळी कामाला लागतो ते..."
3
काय सांगता! ट्रम्प आता प्रत्येक अमेरिकन नागरिकाला २ हजार डॉलर्स देणार; नेमका प्लान काय?
4
डोक्यात क्रिकेटची बॅट हाणली, 'ती' ओरडत राहिली पण तो थांबला नाही; व्यावसायिकाने पत्नीला संपवले
5
महिलांमध्ये झपाट्याने वाढतेय फुप्फुसाच्या कर्करोगाचे प्रमाण, प्रदूषण हेच मोठे कारण
6
पीपीएफमधून दरमहा कमवा १ लाखाहून अधिक करमुक्त उत्पन्न! किती करावी लागेल गुंतवणूक?
7
"चांगलं बोलता येत नसेल तर तोंड बंद ठेवा", ऐश्वर्याच्या ट्रोलिंगवरुन भडकली रेणुका शहाणे
8
क्राईम कुंडली! जेलमध्ये असलेल्या गँगस्टरच्या घरी कोट्यवधींचं घबाड; २२ तास नोटा मोजून थकले पोलीस
9
रेप, ब्लॅकमेलिंग अन् गर्भपात...! ‘हॅप्पी पंजाबी’ बनून ओळख लपवली, कलमा पठणावरून 'राक्षसी' मारझोड करायचा इरफान
10
"कुराणची शपथ घेऊन सांगतो, भाजप...!" मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला यांचा मोठा दावा, राजकारण तापलं
11
अमेरिकेत ४० दिवसांपासून शटडाऊन, हजारो विमान प्रवाशांसाठी 'लॉकडाऊन'
12
१३०२ उमेदवारांचे भवितव्य होणार ईव्हीएममध्ये बंद, बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यातील प्रचाराची सांगता
13
“टॅरिफला विरोध करणारे मूर्ख, आम्ही अमेरिकेला श्रीमंत केले, इथे महागाई नाही”: डोनाल्ड ट्रम्प
14
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
15
जडेजा-सॅमसनच्या 'डील'मध्ये डेवाल्ड ब्रेव्हिसचा अडथळा, आयपीएलमध्ये चेन्नई, राजस्थान यांच्यात खेळाडूंची अदलाबदली होण्याची शक्यता
16
Kalbhairav Jayanti 2025: बुधवार १२ नोव्हेंबर कालभैरव जयंती; शिवाचे हे उग्ररूप कशासाठी?
17
बिहारमध्ये योगी आदित्यनाथ यांचा झंझावात, १० दिवसांत ३१ रॅली; काँग्रेस आणि RJD वर घणाघात
18
'नीट'च्या दोन मार्कलिस्ट अन् विद्यार्थिनीला धक्का, पालकही चिंताग्रस्त; कुटुंब निराशेच्या गर्तेत
19
विद्यापीठात पॉलिमर केमिस्ट्री प्रयोगशाळा; संशोधकांना मिळेल प्रेरणा, विकासात योगदान
20
परराज्यातील मुलांना एमबीबीएसला प्रवेश घेण्याची मुभा द्या, पालघरच्या कॉलेजने घेतली उच्च न्यायालयात धाव

सांगलीकरांना शुद्ध पाणीपुरवठा कधी?

By admin | Updated: December 26, 2015 00:04 IST

जलशुद्धीकरणाचे काम रखडले : निधी नसल्याचा परिणाम; उन्हाळ्यात शहरावर तीव्र पाणी टंचाईचे सावट

शीतल पाटील-- सांगली -शहरातील सर्व राजकीय पक्ष, त्यांची नेतेमंडळी, एवढेच काय, महापालिकेच्या सत्तासिंहासनावर बसणारे पदाधिकारी असा प्रत्येकजण सांगलीकरांना शुद्ध पाणीपुरवठा करणार, अशी आरोळी ठोकत असतो. पण आजअखेर सांगलीकरांच्या नशिबी अशुद्ध पाणीच आले आहे. शुद्ध पाण्यासाठी ५६ व ७० दशलक्ष लिटर (एमएलडी) क्षमतेच्या दोन जलशुद्धीकरण केंद्रांचे काम हाती घेतले आहे. पण निधीअभावी या केंद्रांचे काम कधी सुरू होते, तर जास्त काळ बंदच असते. सध्याच्या फिल्टरमध्ये गाळ भरलेला आहे. या अशुद्ध पाण्याचे ना महापालिकेला काही देणे-घेणे आहे, ना लोकप्रतिनिधींना!महापालिका, लोकसभा, विधानसभा निवडणुकीत सारेच राजकीय पक्ष सांगलीकरांना शुद्ध पाणी देणार, अशी घोषणा करतात. पण प्रत्यक्षात सत्तेत आल्यानंतर त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जाते. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे दोन जलशुद्धीकरण केंद्रांचे रखडलेले काम! २००८ मध्ये नव्याने सत्तेत आलेल्या विकास महाआघाडीने वारणा उद्भव पाणी योजनेचे मूळ स्वरुप बदलून सांगलीकरांच्या माथी कृष्णेचेच दूषित पाणी मारले. कृष्णा नदीतील पाणीही शुद्ध करून नागरिकांना देता येते, असे सांगत माळबंगला येथे ७० एमएलडी जलशुद्धीकरण केंद्राचे काम हाती घेतले. अगदी सांडपाणीसुद्धा या जलशुद्धीकरण केंद्रात शुद्ध होईल, असे सांगितले जात होते. आता तीन ते चार वर्षे होऊन गेली, पण या जलशुद्धीकरण केंद्राचे काम पूर्ण झालेले नाही. याच्या ठेकेदाराचे बिल अडकल्याने त्याने मध्यंतरी कामच बंद ठेवले होते. हिराबाग वॉटर वर्क्स येथे ५६ एमएलडी जलशुद्धीकरण केंद्राचे कामही रडतखडत सुरू आहे. या दोन्ही जलशुद्धीकरण केंद्रांसाठी तीन ते चार कोटीचा निधी आवश्यक आहे. राज्य शासनाकडून वित्त आयोगाचा कोट्यवधी रुपयांचा निधी पालिकेला प्राप्त झाला आहे. घरकुल, ड्रेनेज यासारख्या स्वत:चा इंटरेस्ट असलेल्या योजनांकडे निधी वळविला. पण नागरिकांना शुद्ध पाणी देण्यासाठी पाणी योजनेवर जादा खर्च करण्याचा विसरच पालिकेला पडला आहे. माळबंगला येथील जलशुद्धीकरण केंद्रातील कॅरीफॅक्युलेटरच्या दुरुस्तीची गरज आहे. यामध्ये गाळ मोठ्या प्रमाणात साचला आहे. गेल्या कित्येक वर्षापासून तेथील गाळ काढलेला नाही. त्यामुळे तो गाळ थेट फिल्टरमध्ये जातो. फिल्टरची बॅकवॉश प्रक्रियाही बंद आहे. वॉश केलेले पाणी दुसऱ्याच्या घरात जाते, म्हणून महापालिकेने कित्येक वर्षे फिल्टरच वॉश केलेला नाही. पाणी पुरवठ्याकडील ड्रेन वॉश पाईपला खासगी लोकांच्या ड्रेनेजचे पाईप जोडले आहेत. असा सारा सावळागोंधळ पाणीपुरवठा विभागात आहे. ड्रेन वॉश पाईपमधील सांडपाणी बंद करून फिल्टर वॉश केल्यास सांगलीकरांना शुद्ध व स्वच्छ पाणीपुरवठा होऊ शकतो. त्यासाठी सहा लाख रुपयांचा खर्च आहे. पण तेही खर्च करण्यात पदाधिकारी व प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी हात आखडता घेत आहेत. कोयना धरण यंदा पूर्ण क्षमतेने भरलेले नाही. नोव्हेंबर महिन्यात कृष्णा नदीतील पाणी पातळी कमी झाली होती. हीच स्थिती कायम राहिल्यास उन्हाळ्यात सांगलीकरांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यादृष्टीने कोणतेही नियोजन महापालिकेने आजअखेर केलेले नाही. त्यामुळे भविष्यात नगरसेवकांच्या घरावर नागरिकांचे मोर्चे निघाले तर आश्चर्य वाटू नये, अशी स्थिती आहे. ‘बांधकाम’चा अभियंता : पाणी पुरवठ्याकडे!बांधकाम विभागाचा अनुभव असलेले नगरअभियंता आर. पी. जाधव यांच्याकडे पाणीपुरवठा व मलनिस्सारण विभागाचा प्रभारी पदभार दिला आहे. त्यांना पाणीपुरवठा व ड्रेनेजबाबत तांत्रिक बाबीची कितपत माहिती असेल, याविषयी साशंकता आहे. जीवन प्राधिकरणकडील एका अधिकाऱ्याची महापालिकेकडे बदली झाली आहे. पण त्यांना स्वतंत्र पदभार दिला नाही. पाणीपुरवठा व ड्रेनेजचा पदभार सोडण्यास जाधव तयार नाहीत. आयुक्त अजिज कारचेही त्यांच्यापुढे हतबल झाले आहेत. आता पालिकेच्या आयुक्त पदाचा कार्यभार जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्याकडे आहे. वाहतुकीबरोबरच प्रशासकीय कामाला शिस्त लावण्यात गायकवाड यशस्वी ठरतील का? हा खरा प्रश्न आहे.दहा टक्के पाणी गळतीशहरातील उपनगरांत पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. काही भागात मुबलक पाणी, तर काही भाग कोरडा अशी स्थिती आहे. त्यावर नियोजनाची गरज आहे. त्यात कृष्णा नदीवरील जॅकवेल ते हिराबाग व माळबंगलापर्यंतच्या अशुद्ध दाबनलिकेवर एअरव्हॉल्व्हला गळती आहे. त्यातून दहा टक्के पाणी वाया जात आहे. गळती काढल्यास दहा टक्के पाणी जादा मिळू शकते. पण याकडे कुणाचेही लक्ष नाही.