शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

उद्योगांची चक्रे फिरली, वसाहत गजबजली--कामगारांचा तुटवडा कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 22:52 IST

कोरोनाची साथ रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा तडाखा आणि त्यानंतर परप्रांतीय कामगारांचे परतणे या संकटांना अंगावर घेत उद्योजकांनी जिद्दीने चक्रे फिरती ठेवली आहेत. फौंड्री, टेक्स्टाईल, खाद्यपदार्थ, रसायन, खते, कृषी प्रक्रिया, प्लास्टिक, रंग, विद्युत व इलेक्ट्रॉनिक उपकरणे, फोर्जिंग, फॅब्रिकेशन या उद्योगांना चालना मिळाली आहे.

ठळक मुद्दे सत्तर टक्के कारखाने सुुरू : नवीन कामगार भरतीही सुरू; कच्चा माल आणि कामगारांचा तुटवडा कायम

सांगली : सांगली-मिरज व कुपवाड वसाहतीतील सत्तर टक्क्यांहून अधिक उद्योग सुरू झाले आहेत. त्यामुळे औद्योगिक वसाहतींचा परिसर गजबजला आहे. उद्योगांना कच्च्या मालाचा तुटवडा आणि कामगार टंचाईला तोंड द्यावे लागत असल्यामुळे बहुतांश उद्योगांत एकच शिफ्ट सुरू आहे.

कोरोनाची साथ रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा तडाखा आणि त्यानंतर परप्रांतीय कामगारांचे परतणे या संकटांना अंगावर घेत उद्योजकांनी जिद्दीने चक्रे फिरती ठेवली आहेत. फौंड्री, टेक्स्टाईल, खाद्यपदार्थ, रसायन, खते, कृषी प्रक्रिया, प्लास्टिक, रंग, विद्युत व इलेक्ट्रॉनिक उपकरणे, फोर्जिंग, फॅब्रिकेशन या उद्योगांना चालना मिळाली आहे. कुपवाड वसाहतीतील सुमारे ८५० पैकी सातशेहून अधिक कारखाने सुरू झाले आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझेशन, कामगारांची आरोग्य तपासणी याची काळजी घेतली जात आहे.

परप्रांतीयांना रोखण्यात : उद्योजकांना यशसांगली, मिरज व कुपवाड वसाहतीतील हजारो परप्रांतीय कामगार गेल्या महिन्याभरात आपापल्या गावी परतले, पण अनेक कारखानदारांनी त्यांना रोखण्यातही यश मिळविले. कारखाना बंद असला तरी पूर्ण पगार दिला, शिवाय जेवणा-खाण्याचीही व्यवस्था केली. आता कारखाने सुरू होताच या कामगारांनी नव्या जोमाने काम सुरू केले आहे. एका फौंड्रीतून ओरिसा भागातील तब्बल ९० कामगार एकाचवेळी निघून गेले. कारखान्यात पुरेसा कच्चा माल नसल्याने त्यांना आठच तास काम मिळत होते. त्यांची मागणी किमान बारा तासांची होती. ती पूर्ण न झाल्याने ते निघून गेले. सध्या हा उद्योग बंद आहे.

मुंबई, पुणे बंदमुळे अडचणीप्लास्टिक, फौंड्री, रसायने, औषधे, रंग या उद्योगांचा बहुतांशी कच्चा माल मुंबई व पुण्याहून येतो. या शहरांत कोरोनामुळे नाकेबंदी असल्याने कच्च्या मालाच्या वाहतुकीत अडथळे येत आहेत. त्याचा त्रास येथील उद्योजकांना होत आहे. उपलब्ध कच्च्या मालाच्याआधारे एका शिफ्टमध्ये काम सुरू आहे.दररोज १२ मेगावॅट विजेचा वापरकुपवाड औद्योगिक वसाहतीत दररोज १७ ते १९ मेगावॅट विजेचा वापर होतो. लॉकडाऊन काळात तो खालावला होता. आता कारखाने सुरू झाल्याने तो १२ मेगावॅटवर पोहोचला आहे. १ जूनपासून तो आणखी वाढण्याचा अंदाज आहे.

जिल्हाभरात १७८७ उद्योग सुरूजिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी सांगितले की, जिल्ह्यात २५ मे अखेर १ हजार ७८७ उद्योग सुरू झाले. २२ हजार ६९२ कर्मचाऱ्यांना कामावर हजर राहण्याची परवानगी दिली आहे. औद्योगिक वसाहतींत ९१४ कारखाने व ११ हजार ३८९ कामगार, तर अन्यत्र ८७३ उद्योग व ११ हजार ३०३ कामगारांचा समावेश आहे. अन्नपदार्थांचे उत्पादन, डेअरी, पशु व पोल्ट्रीखाद्य, शीतगृहे, गोदामे, पुठ्ठ्याचे बॉक्स, औषधे व वैद्यकीय साधने, पॅकिंग आदी उद्योग सुरू झाले.

टॅग्स :SangliसांगलीMIDCएमआयडीसी