फोटो : सुरेंद्र दुपटे, कौसेन नौशाद मुल्ला
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कधी रस्त्यावर... तर कधी रस्त्यालगत पार्क केलेल्या गाड्या... हे चित्र सांगलीकरांसाठी नवीन नाही. बेशिस्त पार्किंगमुळे होणाऱ्या वाहतुक कोंडीवर आजअखेर उपाय शोधलेला नाही. उलट आता पोलीस ठाण्यासमोरच बेकायदेशीरपणे वाहने पार्क केली जात आहेत. बेकायदा पार्किंग व्यवस्थेबाबत पोलीस व महापालिका प्रशासनाने नेहमीच उदासीन भूमिका घेतली आहे.
शहरातील मुख्य बाजारपेठेसह प्रमुख चौकात वाहतुकीची कोंडी हा नेहमीचाच विषय बनला आहे. त्यात अनेक ठिकाणी भर रस्त्यावर दुचाकी, चारचाकी वाहने पार्क केली जातात. त्यांच्यावर दंडात्मक कारवाईसाठी वाहतूक शाखेचे पथकही आहे, पण पोलीस ठाण्यासमोर वाहने पार्क केली असतील तर कारवाई कोण करणार? पोलिसांना नियम नाहीत का? असा सवालही उपस्थित होत आहे.
चौकट
सांगली शहर पोलीस ठाणे
महापालिका, न्यायालय, मुख्य बाजारपेठ अशा गजबजलेल्या परिसरात सांगली शहर पोलीस ठाणे आहे. पोलीस ठाण्यासाठी दोन प्रवेशद्वार असले तरी सध्या एक बंद आहे. पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वाहनांसाठी आतमध्ये जागा आहे, पण पोलीस ठाण्यात येणाऱ्या नागरिकांना मात्र आपली वाहने रस्त्यावर पार्क करावी लागतात. तीही बेशिस्तपणे लावलेली असतात.
चौकट
शहरातील पोलीस ठाण्यांना पार्किंगची सोय
१. शहरात चार प्रमुख पोलीस ठाणे आहेत. त्या सर्वच पोलीस ठाण्यांना पार्किंगची सोय आहे.
२. शहर पोलीस ठाण्याकडे पार्किंगसाठी जागा कमी आहे. इतर पोलीस ठाण्यात जागेचा प्रश्न नाही.
३. शहर पोलिसांनी जप्त केलेला ट्रक गेली महिन्याभरापासूनच रस्त्यावर पार्क केला आहे.
चौकट
कोट
शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्याचे काम नियोजनबद्धरीत्या सुरू आहे. त्यातून अनेक ठिकाणी बेशिस्त पार्किंग दिसून येते. त्यावर दंडात्मक कारवाई केली जात आहे. पोलीस ठाण्यासमोरील बेकायदा पार्किंगवर कारवाई सुरू आहे.
- प्रज्ञा देशमुख, सहा. पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखा.
चौकट
शहरातील नो पार्किंग कारवाई
२०१९- १५४९०
२०२० - १२६८०
२०२१ -५००१