शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

Ganpati Festival - सांगलीत गणरायाचे जल्लोषात स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 16:06 IST

भक्तिसागरात न्हाऊन निघालेले भाविक... उत्साहाच्या उधाणलेल्या लाटा... नयनरम्य आरास, विद्युत रोषणाईचा थाट... रांगोळ््या, अगरबत्तीच्या सुगंधाचा दरवळ अशा मंगलमयी वातावरणात आणि बाप्पा मोरयाऽऽऽच्या गजरात गणरायाच्या सांगली नगरीत सोमवारी बाप्पांचे जल्लोषी आगमन झाले.

ठळक मुद्देसांगलीत गणरायाचे जल्लोषात स्वागतमंगलमयी वातावरण आणि बाप्पा मोरयाऽऽऽचा गजर

सांगली : भक्तिसागरात न्हाऊन निघालेले भाविक... उत्साहाच्या उधाणलेल्या लाटा... नयनरम्य आरास, विद्युत रोषणाईचा थाट... रांगोळ््या, अगरबत्तीच्या सुगंधाचा दरवळ अशा मंगलमयी वातावरणात आणि बाप्पा मोरयाऽऽऽच्या गजरात गणरायाच्या सांगली नगरीत सोमवारी बाप्पांचे जल्लोषी आगमन झाले.महापुराच्या कटू आठवणी विसरून लाडक्या देवाला भेटण्यासाठी आतुर झालेल्या भाविकांना यावेळी गणरायाच्या स्वागताच्या तयारीला फारसा वेळ मिळाला नाही. तरीही गेल्या दोन दिवसात बाजारपेठांमध्ये खरेदीला झालेली गर्दी आणि सर्वत्र तयारीचा उत्साह दिसून आला.

उत्साही लाटेवर स्वार होत भाविकांनी सोमवारी गणरायाचे पारंपरिक पद्धतीने स्वागत केले. पहाटेपासूनच घरगुती तसेच सार्वजनिक गणेश मंडळांच्या मूर्ती आणण्यासाठी लगबग सुरू होती. त्यामुळे सकाळी सातपासूनच बाजार फुलला होता. दिवसभर सांगलीच्या हरभट रस्ता, मारुती रस्ता परिसरात साहित्य खरेदीसाठी गर्दी होती.

मारुती रस्ता, गावभाग, बसस्थानक परिसर, कर्मवीर भाऊराव पाटील चौक याठिकाणी मूर्ती खरेदीसाठी गर्दी होती. महापुरामुळे यंदा साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय मंडळांनी घेतल्यामुळे शहरात दिवसभर कुठेही सवाद्य मिरवणुका दिसल्या नाहीत. शांततेत आणि बाप्पा मोरयाच्या गजरात साध्या पद्धतीने गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली.

टॅग्स :Ganpati Festivalगणेशोत्सवSangliसांगली