शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
फक्त महिला रडत होती म्हणून हुंड्यासाठी छळाचा गुन्हा होत नाही- दिल्ली उच्च न्यायालय
4
लेख: कुठे नाचताय जनाब मुनीर, शुद्धीवर तरी आहात का? चेष्टामस्करीलाही काही मर्यादा असते!
5
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
6
आजचा अग्रलेख: भारताच्या प्रवासाचा ‘रोडमॅप’! विक्रमांपेक्षाही भाषणाचा आशय अधिक महत्त्वाचा
7
वर्गात मुलांनी सरळ रांगेत बसावे की ‘यू’ आकारात? शिक्षकापेक्षा मुले एकमेकांकडून जास्त शिकतात!
8
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
9
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
10
चिनी बदकांमुळे ‘शटलकॉक’ महाग! लोकांच्या खानपानाच्या सवयी बदलल्या अन् परिणाम किमतींवर झाला...
11
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
12
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
13
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
14
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
15
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
16
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
17
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
18
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
19
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
20
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार

जतमध्ये पावसासाठी गाढवांचे लग्न...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2018 23:21 IST

जत : सनई-चौघड्याचा मंगलमय सूर... बॅँडची धून... पावण्या-रावळ्यांची लगीनघाई... पुष्प पाकळ्यांच्या अक्षतांचा सुगंधी वर्षाव... ना फटाक्यांचा आवाज, ना डॉल्बीचा दणदणाट, अशा मंगलमय वातावरणात बुधवारी सायंकाळी जत येथील विठ्ठलनगर परिसरात एक आगळावेगळा विवाहसोहळा झाला. शहरातील शेकडो वºहाडींची उपस्थिती होती. हा विवाहसोहळा होता गाढवांचा...वरुणराजाच्या अवकृपेमुळे वैतागलेल्या नागरिकांनी जत शहरात गाढवांचे लग्न लावण्याचा ...

जत : सनई-चौघड्याचा मंगलमय सूर... बॅँडची धून... पावण्या-रावळ्यांची लगीनघाई... पुष्प पाकळ्यांच्या अक्षतांचा सुगंधी वर्षाव... ना फटाक्यांचा आवाज, ना डॉल्बीचा दणदणाट, अशा मंगलमय वातावरणात बुधवारी सायंकाळी जत येथील विठ्ठलनगर परिसरात एक आगळावेगळा विवाहसोहळा झाला. शहरातील शेकडो वºहाडींची उपस्थिती होती. हा विवाहसोहळा होता गाढवांचा...वरुणराजाच्या अवकृपेमुळे वैतागलेल्या नागरिकांनी जत शहरात गाढवांचे लग्न लावण्याचा निर्णय घेतला. यावर्षी पावसाने बगल दिल्याने तालुक्यातील खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला आहे. रब्बी हंगामही वाया जाण्याच्या मार्गावर आहे. पाऊस नसल्यामुळे रब्बी पेरण्या खोळंबल्या आहेत. वरुणराजाला प्रसन्न करण्यासाठी विठ्ठलनगर येथील शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन गाढवांचे लग्न लावून दिले. शहराच्या मुख्य रस्त्यावरुन त्यांची सवाद्य मिरवणूक काढली.कमी पाऊस व काम नसल्यामुळे जत शहरातील गाढवांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे लग्न लावून मिरवणूक काढण्यासाठी आसंगी (जत) येथून गाढवांची जोडी आणण्यात आली. खलाटी (ता. जत) येथून वाजंत्री आले होते. सुरुवातीस गाढवांना सजवून त्यांचे लग्न लावण्यात आले.यावेळी विठ्ठलनगर, वसंतनगर येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यानंतर निगडी कॉर्नर, महाराणा प्रताप चौक, जयहिंद चौक, गांधी चौक, वाचनालय चौक व थोरली वेस येथून मिरवणूक काढण्यात आली. पोलीसपाटील मदन माने-पाटील यांच्याहस्ते गाढवांची पूजा करून पावसासाठी वरुणराजाला साकडे घालण्यात आले.यावेळी सामाजिक कार्यकर्ते पापा सनदी, रमेश माळी, दत्ता कांबळे, मिलिंद शिंदे, बाळू कांबळे, दादासाहेब कांबळे, सदा कांबळे, अंबादास माळी, चिवडाप्पा चौगुले, मुºयाप्पा माने, संतोष माने, राम पवार, रवींद्र कांबळे, यल्लाप्पा बामणे, सुनील सूर्यवंशी, अनिल डोंबाळे, महेश तंगडी, ज्योत्याप्पा बेळुंखी उपस्थित होते.