शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सुप्रीम कोर्टाला विचारले १४ प्रश्न; नेमकं काय घडलं?
2
लष्करी जवानाकडे हेरॉईन सापडले; श्रीनगरहून पंजाबला करत होता तस्करी, अटकेमुळे खळबळ
3
हृदयद्रावक! डोक्यावरती अक्षता पडल्या अन् दुसऱ्याच दिवशी सकाळी नववधूला मृत्यूने गाठलं
4
Maharashtra Politics :'फडणवीसांनी डोनाल्ड ट्रम्प यांनाच कुलदैवत मानावं', संजय राऊतांची भाजपावर टीका
5
Mumbai: मेट्रो-३ च्या प्रवासात मोबाइलला 'नो नेटवर्क', प्रवाशांची उडते तारांबळ, तिकीट काढण्यासाठी मार्गदर्शक सूचना...
6
वेळ काय, तुम्ही बोलता काय...; कर्नल सोफिया यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या विजय शाहंना कोर्टाने फटकारलं
7
४० हजारांचं पॅकेज, ५ तासांची सर्जरी... हेअर ट्रान्सप्लांट करणाऱ्या अनुष्काबद्दल धक्कादायक खुलासे
8
तुर्कीच्या सफरचंदावर घातलेली बंदी पाकिस्तानींना झोंबली; पुण्याच्या सुयोग झेंडेंना धमक्यांचे फोनवर फोन
9
हेअर ट्रांसप्लांटमुळे दोघांचा मृत्यू; ही सर्जरी खरंच सुरक्षित आहे का? जाणून घ्या सविस्तर माहिती...
10
दोन्ही मुलांना मैदानात उतरवलं, भारताचंही नाव घेतलं! इम्रान खानच्या खेळीनं पाकच्या राजकारणात खळबळ  
11
रोहित शर्मा 'भलतेच काहीतरी' वाटावे असे बोलून गेला, मग लगेच असं दिलं स्पष्टीकरण (VIDEO)
12
ट्रम्प यांचं टॅरिफ लागून अवघा काही वेळही झाला नाही आणि भरला सरकारचा खजिना, कुठून आला पैसा?
13
जर एखाद्या देशाने 'Nuclear' हल्ल्याचा निर्णय घेतला तर त्याची प्रक्रिया काय, वेळ किती लागतो? 
14
कोंकणा सेन शर्मा घटस्फोटानंतर पुन्हा प्रेमात? ७ वर्ष लहान अभिनेत्याला डेट करत असल्याच्या चर्चा
15
पाकिस्तानला लोनवर लोन... चीनसोबत अमेरिकेची वाढती मैत्री तर नाही ना कारण? भारताचं टेन्शन काय?
16
Datta Upasana: जगातील एकमेव दत्तहस्त पूजास्थान; जिथे दत्त महाराजांच्या हाताचे छाप उमटले!
17
"ती भारताबाहेर गेली अन्...", दिग्दर्शकाने सांगितलं 'रेड २'मध्ये इलियानाला न घेतल्याचं कारण
18
नेहा पेंडसेच्या लेकींना पाहिलंत का?, फॅमिलीसोबत बालीत करतेय व्हॅकेशन एन्जॉय
19
रुपाली गांगुलीला सेटवर कुत्रा चावला? 'अनुपमा' फेम अभिनेत्रीचा राग अनावर, म्हणाली- "हात जोडून सांगते.."
20
ऑपरेशन सिंदूर: पाकमधील गुप्तहेरांकडून सिग्नल आला, भारतीय सैन्याने पाच दिवस आधीच हल्ला चढवला

वृध्द साहित्यिक-कलावंतांना मानधन देण्यासाठी पारदर्शक कार्यवाही करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 15:27 IST

Collcator Sangli : वृध्द साहित्यिक व कलाकारांचे सन 2020-21 साठीच्या मानधन मागणीसाठी जिल्ह्यातून 275 अर्ज प्राप्त झाले आहेत. या प्राप्त अर्जांची छाननी करून शासन निर्णयानुसार 100 अर्जांना मान्यता देण्यात येणार आहे. या मानधन योजनेचा लाभ देण्यासाठी अर्जांची छाननी पारदर्शक करून पात्र वृध्द साहित्यिक कलाकारांना लाभ दिला जाईल, असे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांनी आयोजित बैठकीत सांगितले.

ठळक मुद्देवृध्द साहित्यिक-कलावंतांना मानधन देण्यासाठी पारदर्शक कार्यवाही करू अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार

सांगली : वृध्द साहित्यिक व कलाकारांचे सन 2020-21 साठीच्या मानधन मागणीसाठी जिल्ह्यातून 275 अर्ज प्राप्त झाले आहेत. या प्राप्त अर्जांची छाननी करून शासन निर्णयानुसार 100 अर्जांना मान्यता देण्यात येणार आहे. या मानधन योजनेचा लाभ देण्यासाठी अर्जांची छाननी पारदर्शक करून पात्र वृध्द साहित्यिक कलाकारांना लाभ दिला जाईल, असे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत गुडेवार यांनी आयोजित बैठकीत सांगितले.जिल्हास्तरीय वृध्द कलाकार मानधन समितीच्या प्रस्ताव पडताळणी बैठकीत ते बोलत होते. यावेळी समितीचे अध्यक्ष महादेव पाटील, नवनिर्वाचित उपाध्यक्ष अविनाश कुदळे, समिती सदस्य अनंत सपकाळ, अरूण पळसुले, गजेंद्र माने, चंद्रकांत मैगुरे, सागर मलगुंडे, सांस्कृतिक कार्य विभागाच्या सदस्या सुनिता आसवले, जिल्हा समाज कल्याण अधिकारी संभाजी पोवार आदि मान्यवर उपस्थित होते.श्री. गुडेवार म्हणाले, कोरोनामुळे वृध्द साहित्यिक व कलाकार यांची बिकट अवस्था झाली आहे. अशा कलाकारांना शासनाची मदत म्हणून ह्यअह्ण वर्गातील कलाकार व साहित्यिकांना 3 हजार 150, ह्यबह्ण वर्ग 2 हजार 700 तर ह्यकह्ण वर्ग साठी 2 हजार 250 रूपये दरमहा मानधन दिले जाते. सांगली जिल्ह्यामध्ये ह्यअह्ण वर्गात 17 ह्यबह्ण वर्ग 115 तर ह्यकह्ण वर्गात 2 हजार 255 अशा एकूण 2 हजार 387 कलाकार व साहित्यिकांचा समावेश आहे.

जिल्ह्यात प्रतिवर्षी 100 साहित्यिक व कलाकारांना मानधन देण्याचे शासनाचे धोरण आहे. तसेच यामध्ये 20 टक्के महिलांचा समावेश असणे आवश्यक आहे. तरी इच्छुक साहित्यिक कलाकारांनी शासनाने ठरवून दिलेल्या नियमांनुसार परिपूर्ण अर्ज समितीकडे सादर करण्याची दक्षता घ्यावी. शासनाच्या या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.समितीचे अध्यक्ष महादेव पाटील यावेळी म्हणाले, कोरोनाच्या सद्यस्थितीमुळे जिल्ह्याच्या ठिकाणी अर्ज सादर करण्यासाठी येणे ही जिकरीचे ठरत आहे. त्यामुळे साहित्यिक व कलाकारांचे अर्ज प्रत्येक तालुक्याच्या पंचायत समिती स्तरावर स्विकारण्याची व्यवस्था करण्यात यावी.

ज्या कलाकारांचे कोरोना परिस्थितीमुळे मानधन थकलेले आहे, त्यांचे मानधन त्वरित देण्याबाबतची कार्यवाही करावी. सद्यस्थितीत तमाशा कलावंत अत्यंत अडचणीत असून या कलावंतांना शासनाची आर्थिक मदत मिळावी यासाठीही समितीमार्फत कार्यवाही व्हावी. यामुळे जास्तीत जास्त साहित्यिक व कलाकारांना न्याय मिळेल अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली

टॅग्स :cultureसांस्कृतिकcollectorजिल्हाधिकारीkolhapurकोल्हापूर