शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

'लाडक्या बहीण'वरुन घराघरांत भांडणे लावण्याचे पाप आम्ही करणार नाही, अंगणवाडी सेविकांचा सर्वेक्षणास नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 18:59 IST

गावपातळीवर फेर सर्वेक्षणाचे काम करताना अडचणी येत असून, काम करणे अवघड

सांगली : लाडकी बहीण योजनेचे सर्वेक्षण करण्यास अंगणवाडी सेविकांनी नकार दिला आहे. त्यामुळे अंगणवाडी सुपरवायझर मदतीला घेऊन सर्वेक्षणाचे काम प्रशासनाने पुढे सुरू ठेवले आहे.ही योजना अंगणवाडी सेविकांना मनस्ताप देणारी ठरल्याचे दिसत आहे. योजना सुरू होताना सरसकट फॉर्म भरा असे आदेश शासनाने दिले होते. तेच फॉर्म आता पुन्हा तपासून अपात्र लाभार्थी निश्चित करा असे सांगण्यात आले आहे. त्यामुळे सेविकांनी हे काम करण्यास नकार दिला आहे. तशी निवेदने जिल्हाधिकारी, महिला व बालकल्याण अधिकारी यांना दिले आहे. फेरसर्वेक्षणाच्या कामास विरोध केला आहे. गावपातळीवर फेर सर्वेक्षणाचे काम करताना अडचणी येत असून, काम करणे अवघड होत आहे अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. अनेक कुटुंबे स्वतंत्र राहत असली तरी, त्यांची शिधापत्रिका एकत्र आहे, त्यांना अपात्र कसे ठरवायचे असा प्रश्न सेविकापुढे आहे. गावपातळीवर या महिलांच्या नाराजीला सामोरे जाण्यास सेविका तयार नाहीत. सेविकांनी सर्वेक्षण करण्यास नकार दिल्याने प्रशासनाने सुपरवायझरना मदतीला घेऊन काम सुरू ठेवले आहे.

भांडणे लावण्यास सांगू नकाएका घरात दोनपेक्षा अधिक लाभार्थी असल्यास दोघींचेच लाभ सुरू ठेवावेत असे आदेश शासनाने दिले आहेत. घरातील कोणाचे लाभ सुरू ठेवायचे हे त्यांच्याकडूनच लिहून घ्या अशी सूचना शासनाने केली आहे. मात्र, यामुळे घराघरांत भांडणे पेटली आहेत. ही भांडणे लावण्याचे काम आम्ही करणार नाही, असे अंगणवाडी सेविकांनी स्पष्ट केले आहे.

लाडकी बहीण योजनेतील लाभार्थीच्या फेरसर्वेक्षणास आम्ही नकार दिला आहे. सध्याच्या कामांचा बोजा पाहता हे काम शक्य नसल्याचे संघटनेने शासनाला कळवले आहे. कुटुंबातील दोनपेक्षा अधिक महिलांना अपात्र ठरविण्याची कसरत सेविका करणार नाहीत. - रेखा पाटील, अंगणवाडी कर्मचारी महासभा 

अपात्र लाभार्थी शोधण्याचे काम जिकिरीचे आहे. ते करणार नसल्याची आमची भूमिका आहे. अपात्र ठरलेल्या महिलेच्या नाराजीचा सामना अंगणवाडी सेविकांना करावा लागत आहे. त्यामुळे आम्ही काम थांबवले आहे. - शुभांगी कांबळे, अंगणवाडी कर्मचारी संघटना, महापालिका क्षेत्र