शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

चांदोलीतून सांगलीकरांना पाणी देण्यासाठी बैठक घेऊ, शरद पवार यांचे आश्वासन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2024 12:15 IST

कृष्णा महापूर नियंत्रण समितीच्या पदाधिकाऱ्यांबरोबर मुंबईत बैठक

सांगली : सांगलीकरांच्यादृष्टीने चांदोली धरणातून थेट पाणी आणण्याचा प्रश्न महत्त्वाचा आहे. या प्रश्नावर जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन ठोस निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले.कृष्णा महापूर नियंत्रण समितीच्या पदाधिकाऱ्यांसाेबत मुंबईत रविवारी बैठक झाली. यावेळी शरद पवार बोलत होते. खासदार सुप्रिया सुळे, महापूर नियंत्रण समितीचे निमंत्रक सर्जेराव पाटील, सेवानिवृत्त अभियंता विजयकुमार दिवाण, प्रभाकर केंगार आदी उपस्थित होते.

मुंबईतील बैठकीत सेवानिवृत्त अभियंता दिवाण यांनी चांदोली धरणातून थेट पाइपलाइनद्वारे सांगली शहराला पाणी मिळाले पाहिजे. यासाठी आराखडे तयार होऊनसुद्धा त्यावरती लक्ष दिले जात नाही. सांगलीतील नागरिकांच्या आरोग्याचे प्रश्न हा चिंतेचा विषय बनत आहे. महापालिकेने महासभेत ठराव मंजूर करूनही चांदोली धरणातून पाणी आणण्याचा प्रस्ताव निधी नसल्याने प्रलंबित आहे, असे त्यांनी सांगितले.शरद पवार म्हणाले, महाराष्ट्राच्या विकासात स्वयंसेवी संस्थांचे खूप महत्त्व आहे. म्हणून स्वयंसेवी संस्था कार्यरत राहणे अत्यंत गरजेचे आहे. या संस्थांचा अभ्यास राज्य शासनाला नक्कीच उपयोगी असतो. सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांच्या पुराच्या प्रश्नावर राज्य शासनाबरोबर बैठक घेऊन ठोस तोडगा काढला जाईल. चांदोली धरणातून थेट पाइपलाइनद्वारे पाणी सांगलीकरांसाठी आणण्याचा फार महत्त्वाचा विषय आहे. शासनाने याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. मी शासनाकडे योग्य तो पाठपुरावा करून शासनासोबत लवकरच बैठक घेण्यात येईल.

नोव्हेंबरमध्ये केंद्रीय जल आयोगासोबत बैठकखासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांच्या पूर प्रश्नाबाबत चर्चा करण्यासाठी केंद्रीय जल आयोगासोबत नोव्हेंबर महिन्यामध्ये बैठक घेण्यात येईल. या बैठकीस जलसंपदाचे अधिकारी, महापूर नियंत्रण समितीच्या पदाधिकाऱ्यांनाही बोलविण्यात येईल. तसेच महाराष्ट्रातील सात महसूल विभागातील स्वयंसेवी संस्था व कार्यकर्ते यांच्यातही बैठक घेणार आहे, असेही त्या म्हणाल्या.

विना खर्चाचे पुरावर उपायप्रभाकर केंगर म्हणाले, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांना पुराचा फटका बसत आहे. या पुरावर विना खर्चाचे उपाय असूनही ते शासन राबवत नाही. तसेच महापूर हा नियंत्रित करता येतो, यासंबंधीचा अहवाल त्यांनी बैठकीत सादर केला.

टॅग्स :SangliसांगलीSharad Pawarशरद पवारWaterपाणी