बुधगाव : कवलापूरकरांनी महाविकास आघाडी पॅनलच्या सदस्यांवर दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी त्यांना लागेल ती मदत करण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करीन, असे प्रतिपादन सहकार आणि कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी केले.
कवलापूर (ता. मिरज) येथे महाविकास आघाडी पॅनलच्या नूतन सदस्यांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते. काँग्रेसचे नेते डॉ. जितेश कदम यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला शिवसेना जिल्हा संघटक बजरंग पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख सुरज पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख तानाजी सातपुते, राष्ट्रवादीचे धनपाल खोत, जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती छायाताई पाटील, समाजकल्याणचे माजी सभापती सदाशिव खाडे उपस्थित होते.
कदम म्हणाले, भानुदास पाटील यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीस कवलापूरकरांनी भरघोस यश दिले. जनतेचा हा कौल लक्षात ठेवून हे पॅनलपुढची वाटचाल करेल. माझ्याकडे कामानिमित्त येणाऱ्या कोणालाही मी रिकाम्या हाताने परत पााठवत नाही.
जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती छायाताई पाटील, मंत्री कदम यांना उद्देशून म्हणाल्या, डॉ. पतंगराव कदम साहेबांचे कवलापूरवर विशेष लक्ष होते. तसे तुमचेही असू द्या. तुमच्या मार्गदर्शनाखाली सौरभ पाटील, भानुदास पाटील कवलापूरच्या थांबलेल्या विकासकामांना गती देऊन, नवे विकासपर्व निर्माण करतील.
याप्रसंगी डॉ. जितेश कदम, बजरंग पाटील, धनपाल खोत यांनी मनोगत व्यक्त केले. सुनील लाड यांनी सूत्रसंचालन केले. सदाशिव खााडे यांनी आभार मानले. यावेळी संतोष मााळकर, शिवसेनेचे प्रदीप जाधव, कैलास गुंडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
चौकट
अपेक्षा पूर्ण करू !
जिल्हा विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष सौरभ पााटील हेही या निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने निवडून आले. त्या अनुषंगाने विश्वजित कदम म्हणाले, ‘सौरभ पाटीलला मी माझा लहान भाऊच समजतो. लहान भावाची प्रत्येक अपेक्षा पूर्ण करणे, हे मोठ्या भावाचे कर्तव्यच असते. त्या कर्तव्यात माझ्याकडून कोणतीही कसूर राहणार नाही. या आमच्या नात्यामुळे कवलापूरकरांच्या बहुतांश अपेक्षा पूर्ण होतील, यात शंका नाही.
फाेटाे : ०७ बुधगाव २
ओळ : कवलापूर (ता. मिरज) येथे महाविकास आघाडीच्या नूतन सदस्यांचा सहकारमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी सौरभ पााटील, डॉ. जितेश कदम, बजरंग पाटील, सदाशिव खाडे उपस्थित होते.