शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

आमचं ठरलंय : यंदा शिराळा काँग्रेसकडेच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 19:12 IST

आगामी विधानसभा निवडणूक शिराळा मतदारसंघातून लढविण्यावर मी ठाम आहे. कार्यकर्त्यांचा विचार घेऊनच या निर्णयावर एकमत झाले आहे. शिवाजीराव देशमुख यांना आदरांजली म्हणून वाळवा-शिराळ्यातील आघाडीच्या नेत्यांनी माझ्या उमेदवारीला पाठिंबा द्यावा. तसे न झाल्यास आम्ही वेगळा विचार करणार आहे. आता आमचं ठरलंय, असे आव्हान सत्यजित देशमुख यांनी लोकमतशी बोलताना काँग्रेस आघाडीला दिले आहे.

ठळक मुद्देआमचं ठरलंय : यंदा शिराळा काँग्रेसकडेच!शिवाजीराव देशमुख यांना आदरांजली

अशोक पाटील इस्लामपूर : आगामी विधानसभा निवडणूक शिराळा मतदारसंघातून लढविण्यावर मी ठाम आहे. कार्यकर्त्यांचा विचार घेऊनच या निर्णयावर एकमत झाले आहे. शिवाजीराव देशमुख यांना आदरांजली म्हणून वाळवा-शिराळ्यातील आघाडीच्या नेत्यांनी माझ्या उमेदवारीला पाठिंबा द्यावा. तसे न झाल्यास आम्ही वेगळा विचार करणार आहे. आता आमचं ठरलंय, असे आव्हान सत्यजित देशमुख यांनी लोकमतशी बोलताना काँग्रेस आघाडीला दिले आहे.देशमुख म्हणाले की, २००९ च्या विधानसभा निवडणुकीत आम्ही आघाडीचा धर्म पाळून राष्ट्रवादीचे उमेदवार मानसिंगराव नाईक यांना सहकार्य करून विजयी केले. आताच्या लोकसभा निवडणुकीतही ह्यस्वाभिमानीह्णच्या राजू शेट्टी यांच्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळेच शिराळा मतदार संघात चांगले मताधिक्य मिळाले आहे.

आता आघाडीतील नेत्यांनी काँग्रेसचा विचार करावा. जिल्ह्यात काँग्रेसची पीछेहाट झाली असली तरी, शिराळा मतदार संघातील काँग्रेसची ताकद आजही अबाधित आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांवरही काँग्रेसचे वर्चस्व आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील यांचा शब्द मानला आहे. तसेच आघाडीचा निर्णयही नेहमीच पाळत आलो आहे. पण त्यामुळेच आमच्यावर अन्याय झाला आहे.

यावेळी मात्र आघाडीचे नेते जयंत पाटील यांनी मोठ्या मनाने हा मतदारसंघ काँग्रेसला सोडून आमचा विचार करावा. ही शिवाजीराव देशमुख यांना श्रध्दांजली ठरणार आहे. मात्र वेगळा विचार झाल्यास आमचं ठरलंय की, यंदाची निवडणूक लढवायचीच. 

टॅग्स :congressकाँग्रेसShivajirao Deshmukhशिवाजीराव देशमुखSangliसांगली