शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: कोणत्याच महापुरुषांची स्वागत कमान नको, बेडग ग्रामसभेत निर्णय; आंबेडकरी समाजाचा सभात्याग 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2023 12:17 IST

पुन्हा संघर्षाची चिन्हे, कमान पाडल्याने आंबेडकरी समाजातर्फे बेडग ते मुंबई लाँग मार्च काढण्यात आला होता

मिरज : बेडग (ता. मिरज) येथे स्वागत कमानीच्या वादाबाबत मंगळवारी झालेल्या ग्रामसभेत गावात जातीय तेढ निर्माण होऊ नये, यासाठी कोणत्याच महापुरुषांची कमान बांधण्यात येऊ नये, असा ठराव बहुमताने करण्यात आला. या निर्णयाविरुद्ध आंबेडकरी समाजाने सभात्याग केला. या निर्णयामुळे पुन्हा संघर्षाची चिन्हे असून, याविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा आंबेडकरी समाजाने दिला आहे.बेडग येथे बांधकाम सुरू असलेली कमान ग्रामपंचायतीने पाडल्याने आंबेडकरी समाजातर्फे बेडग ते मुंबई लाँग मार्च काढण्यात आला होता. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कमान पाडणाऱ्या ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून प्रशासनातर्फे स्वागत कमान पुन्हा बांधण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. त्यानुसार गावात स्वागत कमान उभारण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ग्रामसभेत ठराव घेण्याच्या सूचना बेडग ग्रामपंचायतीला दिल्या होत्या.गावात स्वागत कमानीवरून तेढ निर्माण झाले होते. त्यामुळे या ग्रामसभेतील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष होते. जिल्हा परिषदेच्या सूचनेने बेडग येथे मंगळवारी ग्रामसभा घेण्यात आली. ग्रामसभेत गावातील २२२९ पुरुष व महिला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त हजेरी लावली. ग्रामसेवक सुनील कोरे यांनी मागील इतिवृत्ताचे वाचन केले. यावेळी गावात स्वागत कमान उभारण्यास परवानगी द्यावी की नाही याबाबत ठराव घेण्यात आला.या ठरावावर गावात कोणत्याही महापुरुषांची स्वागत कमान बांधण्यास परवानगी देऊ नये. या ठरावाच्या बाजूने दोन हजारांवर ग्रामस्थांनी हात उंचावून मतदान केल्याने हा ठराव बहुमताने मंजूर झाला. गावात फक्त ग्रामदैवत मरगाई देवीची कमान व्हावी व गावात महापुरुषांच्या नावाने एक अभ्यासिका करण्यात यावी, असा ठराव मंजूर करण्यात आला.स्वागत कमान बांधकामास परवानगी नाकारण्याच्या निर्णयामुळे ग्रामसभेस उपस्थित आंबेडकरी समाजाने सभात्याग केला. ग्रामसभेच्या ठरावाचा आंबेडकरी समाजातर्फे डाॅ. महेशकुमार कांबळे यांनी निषेध केला. याविरोधात दि. १ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार असल्याचेही डाॅ. कांबळे यांनी सांगितले.

माेठा पोलिस बंदाेबस्तग्रामसभेच्या पार्श्वभूमीवर गावात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात होता. ग्रामसभेस आलेल्या ग्रामस्थांना ओळखपत्र पाहून प्रवेश देण्यात आला. सभेस ग्रामसेवक सुनील कोरे, गटविस्तार अधिकारी सदाशिव मगदूम, तलाठी मनोहर माळी, सहायक गटविकास अधिकारी ज्ञानदेव मडके, पोलिस निरीक्षक संजीव झाडे, भगवान पालवे, गणेश कोकाटे, रवींद्र भापकर, सरपंच उमेश पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :Sangliसांगली