ऐतवडे बुद्रुक : वाळवा तालुक्यातील कार्वे, ढगेवाडी, ऐतवडे बुद्रुक, जक्राईवाडी या गावांना वरदान असणाऱ्या वाकुर्डे उपसा सिंचन योजनेचे काम सध्या बंद आहे. याबाबत उपवनरक्षक यांना शेतकऱ्यांच्या सह्यांचे निवेदन, ग्रामपंचायतींचा ठराव व जलसंपदा विभागाचा प्रस्ताव सादर केला असून महिना-पंधरा दिवसात परवानगी येऊन अधिक जोमाने काम सुरू होऊन मेपर्यंत शेतकऱ्यांना पाणी मिळेल, असा ठाम विश्वास समाजसेवक बबन कचरे यांनी दिला.
वरील गावांना वरदान असणाऱ्या वाकुर्डे बुद्रुक योजनेचे या भागातील काम सुरू होते. मागील मे महिन्यात येथे पाणी येण्याची शक्यता होती, मात्र कोरोनामुळे येथील काम बंद पडले. त्यानंतर काम सुरू झाले, परंतु ढगेवाडी येथील वन विभागाच्या अडथळ्यामुळे हे काम पुन्हा थांबवण्यात आले. बबन कचरे यांनी त्याचा सातत्याने पाठपुरावा करून काम लवकरात लवकर सुरू करण्यात यावे यासाठी विविध विभागांना पत्रव्यवहार केले. तरी रखडलेले काम लवकरच सुरू होऊन मे महिन्यात शेतकऱ्यांना पाणी मिळेल, अशी माहिती त्यांनी दिली.
फोटो - ०७०२२०२१-आयएसएलएम- ढगेवाडी न्यूज
ढगेवाडी येथे बबन कचरे यांंनी वाकुर्डे बुद्रुक योजनेच्या कामाची पाहणी केली.