शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

टेंभूच्या पाण्यातून बाबरांना गुलाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 13:46 IST

आ. अनिल बाबर हे त्यांच्या राजकीय कारकीर्दीत यावेळी प्रथमच ह्यडबल आमदारह्ण झाले. विरोधकांनी टेंभू योजनेवरून त्यांच्यावर कितीही आरोप केले तरी, टेंभूचे पाणीच बाबर यांना गुलाल घेऊन आले. अत्यंत अटीतटीच्या या निवडणुकीत आटपाडी तालुक्यातील माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, जि. प.चे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख आणि भाजपचे नेते गोपीचंद पडळकर हे नेते किंगमेकर ठरले.

ठळक मुद्देटेंभूच्या पाण्यातून बाबरांना गुलालराजकीय कारकीर्दीत प्रथमच डबल आमदार

अविनाश बाड आटपाडी : आ. अनिल बाबर हे त्यांच्या राजकीय कारकीर्दीत यावेळी प्रथमच डबल आमदार झाले. विरोधकांनी टेंभू योजनेवरून त्यांच्यावर कितीही आरोप केले तरी, टेंभूचे पाणीच बाबर यांना गुलाल घेऊन आले. अत्यंत अटीतटीच्या या निवडणुकीत आटपाडी तालुक्यातील माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, जि. प.चे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख आणि भाजपचे नेते गोपीचंद पडळकर हे नेते किंगमेकर ठरले.विधानसभा निवडणुकीपूर्वी आ. बाबर यांच्याविरुद्ध सर्व विरोधक एकत्र येतील आणि सक्षम आव्हान उभे करतील, असे चित्र निर्माण झाले होते. पण राज्यात भाजप-शिवसेनेची युती झाली आणि मतदारसंघातील राजकीय समीकरण एकदम उलटे झाले. खासदार संजयकाका पाटील यांनी देशमुख बंधूंशी केलेली शिष्टाई महत्त्वाची ठरली.

देशमुख गटाचे कार्यकर्ते आधी खूप संताप व्यक्त करीत होते. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजेंद्रअण्णा देशमुख यांच्यासह नेत्यांची पुण्यात बैठक घेतली. त्या बैठकीनंतर निवडणुकीचे चित्र पालटले. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी गोपीचंद पडळकर यांनाही मेळावा घेऊन पाठिंबा देण्याचा आग्रह केला. त्यांनीही ठामपणे पाठिंबा जाहीर करून युतीधर्म पाळण्याचा निर्धार व्यक्त केला. याशिवाय राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख, कॉँग्रेसचे जयदीप भोसले, कॉँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष वसंतराव गायकवाड यांनीही बाबर यांना पाठिंबा दिला.विशेष म्हणजे नेत्यांनी कुठेच आतून-बाहेरून शंकास्पद काहीही केले नाही. अर्थात ज्या कार्यकर्त्यांना अगदी तुरुंगवारी झाली, अशा थोड्या अतिनाराज मंडळींनी माजी आमदार सदाशिवराव पाटील यांची कपबशी हाती घेतली. पण हा अपवाद वगळता खानापूर तालुक्याचे मतदान जादा असूनही आटपाडी तालुक्याने बाबर यांना १७ हजार ७५० एवढे मताधिक्य दिले. त्यामुळे शिवसेनेचा भगवा फडकविण्यात आटपाडीकरांचाच मोठा वाटा आहे.

दुसरीकडे सदाशिवराव पाटील आटपाडी तालुक्यातील उमेदवाराला पाठिंबा देतील, अशी शक्यता व्यक्त होत असताना, त्यांनी अंधारात उडी मारली. निवडणुकीआधी काही दिवसच त्यांनी तालुक्यात संपर्क केला. त्यामुळे हंगामी राजकारणी अशी त्यांच्यावर टीका झाली. या धोरणात त्यांनी बदल करण्याची गरज आहे.

टॅग्स :khanapur-acखानापूरSangliसांगलीAnil Baburअनिल बाबर