शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

महापौरांच्या प्रभागात टँकरने पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2019 17:52 IST

ऐन उन्हाळ्यात पाण्याची मागणी वाढली असताना, अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे मिरज शहरात पाणीटंचाई आहे. महापौरांच्या प्रभागात समतानगर परिसरात टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. शहरात दररोज ३५ दशलक्ष लिटर पाण्याची मागणी असताना, २५ दशलक्ष लिटर पाणी पुरवठा होत असल्याने पाण्यासाठी नागरिकांची धावाधाव सुरू आहे.

ठळक मुद्देमहापौरांच्या प्रभागात टँकरने पाणी अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे मिरज शहरात पाणीटंचाई

मिरज : ऐन उन्हाळ्यात पाण्याची मागणी वाढली असताना, अपुऱ्या पाणीपुरवठ्यामुळे मिरज शहरात पाणीटंचाई आहे. महापौरांच्या प्रभागात समतानगर परिसरात टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. शहरात दररोज ३५ दशलक्ष लिटर पाण्याची मागणी असताना, २५ दशलक्ष लिटर पाणी पुरवठा होत असल्याने पाण्यासाठी नागरिकांची धावाधाव सुरू आहे.मिरज शहरासाठी ५० वर्षापूर्वीच्या जुन्या पाणीपुरवठा योजनेवर मोठा ताण आहे. लोकसंख्येत मोठी वाढ झाल्याने मिरज शहर व विस्तारित भागातील तब्बल २ लाख लोकसंख्येसाठी दररोज ३५ दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता आहे. मात्र दररोज २५ दशलक्ष लिटर पाणीपुवठा होत असल्याने विस्तारित भागात पाणीटंचाई व शहरात कमी दाबाने पाणीपुवठ्याची समस्या आहे. त्यातच जुन्या जलवाहिन्यांच्या वारंवार गळतीमुळे पाणीपुरवठा वारंवार विस्कळीत होतो.शहराच्या विस्तारित भागात महापालिकेतर्फे पाच हजार लिटर क्षमतेच्या पाण्याच्या टाक्यांत टँकरने पाणी सोडण्यात येत आहे. पाच वर्षापूर्वी मिरजेत दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रोच्या साथीमुळे अनेकांचे बळी गेल्यानंतर, जुन्या व जीर्ण जलवाहिन्या बदलून सुधारित नळपाणीपुरवठ्यासाठी मिरज शहरासाठी १०८ कोटी रूपये खर्चाच्या अमृत जल योजनेस राज्य शासनाने मंजुरी दिली. मात्र ही नळपाणी पुरवठा योजना रखडल्याने पाण्याची समस्या कायम आहे.महापौरांचा प्रभाग असलेल्या समतानगरात एक दिवसआड नळाला पाणी येत असून चार दिवसांपूर्वी पाणीपुरवठा यंत्रणेत बिघाड झाल्याने टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पाणीपुरवठा विभागाचा अनागोंदी कारभार व सुधारित नळपाणी योजना रखडल्याने मिरज शहरात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. कृष्णाघाट येथून ताशी १५ लाख लिटर क्षमतेने २४ तास पाणी उपसा केल्यानंतरही, पाणी वितरण यंत्रणेतील त्रुटीमुळे शहरात पाणी अपुरे पडत आहे.शहरात दाट लोकवस्तीत दूषित पाण्याच्या पुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आहे. उन्हाळ्यात पाण्याची मागणी वाढली असताना, शहरातील अनेक भागात अपुरा पाणीपुरवठा होत आहे. 

टॅग्स :water shortageपाणीटंचाईMuncipal Corporationनगर पालिकाSangliसांगली