शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

तासगावात पाणीपुरवठा जॅकवेलचा ठेका देणार नगरपालिका सभा : राष्टवादीचा विरोध डावलून मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 20:02 IST

तासगाव शहराला पाणी पुरवठा होणाऱ्या पाचवा मैल येथील मुख्य जॅकवेलवर कामासाठी नगरपालिकेचे कर्मचारी कार्यरत आहेत. त्याऐवजी पाणी पुरवठ्याचे जॅकवेल ठेका पध्दतीने चालविण्यास देण्याचा

तासगाव : तासगाव शहराला पाणी पुरवठा होणाऱ्या पाचवा मैल येथील मुख्य जॅकवेलवर कामासाठी नगरपालिकेचे कर्मचारी कार्यरत आहेत. त्याऐवजी पाणी पुरवठ्याचे जॅकवेल ठेका पध्दतीने चालविण्यास देण्याचा ठराव गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. राष्टवादीने या ठरावाला विरोध केला. त्यानंतर ठराव मताला टाकून बहुमताच्या जोरावर हा ठराव मंजूर झाला. यावेळी घनकचरा व्यवस्थापनासाठी शासनाकडून मंजूर झालेला ३ कोटी ५४ लाखांचा निधी खर्च करण्याचा विषयही मंजूर करण्यात आला.

नगराध्यक्ष डॉ. विजय सावंत यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. मुख्याधिकारी अभिजित वायकोस, उपनगराध्यक्ष दीपाली पाटील यांच्यासह सर्व नगरसेवक यावेळी उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीलाच पक्षप्रतोद अनिल कुत्ते यांनी विषयपत्रिकेवरील वीसही विषय एकमताने मंजूर करण्याची मागणी केली. भाजपच्या सर्व नगरसेवकांनी त्याला सहमती दर्शवली. मात्र राष्टवादीच्या नगरसेवकांनी जॅकवेलवरील काम ठेका पध्दतीने देण्याच्या विषयाला आक्षेप घेतला. अन्य शहरांच्या तुलनेत तासगावला पाणी पुरवठा चांगल्या पध्दतीने होतो.

जॅकवेलच्या ठिकाणीही नगरपालिकेचे कर्मचारी चांगल्या पध्दतीने काम करतात. त्यामुळे हे काम ठेका पध्दतीने देऊ नये, अशी मागणी राष्टवादीच्या नगरसेवकांनी केली. राष्टवादीच्या विरोधामुळे नगराध्यक्ष सावंत यांनी हा विषय मताला टाकण्याचा निर्णय घेतला. १४ विरूध्द ८ मतांनी ठेका देण्याचा विषय मंजूर झाला.स्वच्छ भारत अभियानांतर्गत घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या आराखड्याला शासनाकडून मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार पालिकेला ३ कोटी ५४ लाखांचा निधी मंजूर झालेला आहे. या निधीतून स्वच्छतेसाठी आवश्यक साधनसामग्री खरेदी करण्याचा निर्णय झाला.यावेळी प्रभाग नऊमध्ये खासदार संजयकाका पाटील यांच्या फंडातून वॉटर एटीएम बसविण्याचा निर्णय झाला.सभेत झालेले महत्त्वाचे निर्णय...- नगरपालिकेच्या शाळांतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्यासाठी ३८ लाखांची तरतूद- वृक्षलागवड अभियानांतर्गत शहरातील दहा हजार रोपांच्या लागवडीचे नियोजन- छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलातील गाळे खरेदीसाठी कमी प्रतिसाद मिळाल्याने, उर्वरित गाळ्यांसाठी कमी अनामत रक्कम घेणे- भिलवडी नाका परिसरातील खोकी जाहीर लिलाव पध्दतीने भाड्याने देणेकर्मचाºयांना मिळणार वैद्यकीय बिलतासगाव नगरपालिकेत अद्यापपर्यंत कर्मचाºयांना वैद्यकीय उपचारासाठी कोणताही खर्च मिळत नव्हता. मात्र गुरुवारी झालेल्या सभेत यापुढे कर्मचाºयांना वैद्यकीय उपचाराचा खर्च शासन निकषांनुसार देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे कर्मचाºयांची अनेक वर्षांची मागणी मान्य झाली असून कर्मचारी संघटनेच्यावतीने नगराध्यक्ष आणि मुख्याधिकाºयांचे आभार व्यक्त करण्यात आले.