शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीकरांनो पाणी जपून वापरा; मिरज, कुपवाड शहरांना आता दिवसातून एकवेळच पाणीपुरवठा

By संतोष भिसे | Updated: June 24, 2023 15:54 IST

कृष्णा नदीतून पिण्यासाठी, शेतीसाठी व उद्योगांसाठी पाणी पुरवताना जलसंपदा विभागाला कसरत करावी लागत आहे

सांगली : लांबलेल्या पावसामुळे निर्माण झालेल्या टंचाईस्थितीचे थेट परिणाम आता नागरिकांना भेडसावू लागले आहेत. सांगली, मिरज व कुपवाड  शहरांना दिवसातून आता एकदाच पाणी पुरविले जाणार आहे. पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.सांगलीचा पाणीपुरवठा कोयना धरणातील पाणीसाठ्यावर अवलंबून आहे. सध्या धरणात ५.६५ टीएमसी इतकाच पाणीसाठा उपलब्ध आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, धरणातून कृष्णा नदीतील विसर्ग कमी करण्यात आल्याने  पाणीपातळी खालावली आहे. पर्जन्यमान व परिस्थितीनुसार महापालिकेला पाणीपुरवठयाचे नियोजन करावे लागत आहे. धरणातील मर्यादीत पाणीसाठ्याचा विचार करुन पाणीपुरवठा सुरु आहे.सांगली, मिरज व कुपवाड शहरांतील काही भागात चोवीस तास पाणीपुरवठा सुरु असतो, तर काही भागात दोनवेळा सोडण्यात येते. पण सध्या टंचाईस्थितीमुळे एकदाच पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कृष्णेच्या पाणीपातळीत वाढ होईपर्यंत, तसेच कोयना धरणात पुरेसा साठा उपलब्ध होईपर्यंत  एकवेळ पाणी सोडले जाणार आहे. नागरिकांनी पाणी काटकसरीने, उकळून व गाळून प्यावे.दरम्यान, कृष्णा नदीतून पिण्यासाठी, शेतीसाठी व उद्योगांसाठी पाणी पुरवताना जलसंपदा विभागाला कसरत करावी लागत आहे. कोयना धरणातील पाणीसाठा निचांकी पातळीवर घसरलेला असतानाच, पावसाचीही चिन्हे नाहीत. त्यामुळे सांगलीकरांना पाण्याची चैन काही दिवसांसाठी थांबवावी लागणार आहे. आजवर अवर्षणस्थितीत शहरांचा पाणीपुरवठा सहसा नियंत्रित करावा लागलेला नव्हता. सध्या मात्र उपशावर मर्यादा आल्या आहेत.गटारीला जाणारे पाणी रोखासागंली, मिरजेत अनेक ठिकाणी नळांना तोट्या नाहीत. पाणीपुरवठा सुरु होतो, तेव्हा धो-धो पाणी गटारांतून वाहून जात असते. अनेक ठिकाणी जलवाहिन्यांच्या गळतीमुळेही रस्त्या-रस्त्यावरुन पाण्याचे लोंढे वाहत असतात. ही नासधूस थांबविण्याची वेळ आली आहे

टॅग्स :SangliसांगलीWaterपाणी