शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 1st T20I : पांड्याची 'फिफ्टी' अन् बुमराहची 'सेंच्युरी'; टीम इंडियासमोर द.आफ्रिकेच्या संघानं टेकले गुडघे
2
“संविधान सोप्या भाषेत समजावून सांगणारा देशात दुसरा CM नाही”; शिंदेंनी केले फडणवीसांचे कौतुक
3
Jasprit Bumrah : जसप्रीत बुमराहनं रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
4
न्यायमूर्ती स्वामीनाथन यांच्याविरोधात INDIA आघाडीचे महाभियोग अस्त्र; १२० खासदारांच्या सह्यांसह प्रस्ताव सादर
5
IND vs SA T20I : कटकच्या मैदानात हार्दिक पांड्याची कडक खेळी; सिक्सरच्या 'सेंच्युरी'सह साजरी केली 'फिफ्टी'
6
IndiGoच्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांचा भडीमार, सरकारसोबतच्या बैठकीत CEO हात जोडताना दिसले...
7
२६.६६ कोटींचा गंडा! बनावट स्टॉक स्कीमच्या जाळ्यात फसला व्यापारी; बँक कर्मचाऱ्यासह ७ जण अटकेत
8
हात फॅक्चर असताना ते मैदानात उतरले अन्...! शतकाच्या बादशहानं शेअर केली दिग्गजासोबतच्या शतकाची गोष्ट
9
स्मृती मानधनाच नव्हे, तर 'या' खास ९ लोकांनीही पलाश मुच्छालला केलं 'अनफॉलो', पाहा यादी
10
"इंदिरा गांधी यांनी मतचोरी करूनच रायबरेली जिंकली..."; भाजपा खासदाराचे राहुल गांधींना उत्तर
11
अनंत अंबानी यांचा आंतरराष्ट्रीय सन्मान! मिळाला प्रतिष्ठेचा 'ग्लोबल ह्यूमॅनिटेरियन' पुरस्कार
12
“उद्धव ठाकरेंच्या हट्टामुळे मला बाहेर काढले, ‘त्या’ भाजपा नेत्याला माफी नाही”: किरीट सोमय्या
13
Numerology: त्रिग्रही लक्ष्मी नारायण योग, ६ मूलांकांना दुपटीने लाभ; पद-पैसा-नफा, चांगला काळ!
14
राज्यात थंडीचा कडाका वाढला! अहिल्यानगरमध्ये ७. ४ सर्वाधिक नीचांकी तापमानाची नोंद
15
"विरोधी पक्षनेते असण्याचा अर्थ असा नाही की..."; राहुल गांधींना संसदेतच ओम बिर्लांनी सुनावलं
16
IND vs SL WT20I :भारतीय संघाची घोषणा; स्मृती मानधना खेळणार; 'या' दोघींना मिळालं मोठं सरप्राइज
17
RSS ला देशातील सर्व संस्थांवर ताबा मिळवायचा आहे; लोकसभेत राहुल गांधी कडाडले...
18
“आम्हाला EVM मशीन एकदा पाहायला हवे”; राहुल गांधींची लोकसभेत मागणी, मतचोरीचा मुद्दा उपस्थित
19
"भाजप काय करतंय हे त्यांनी जगाला दाखवून दिलं"; सुप्रिया सुळेंनी केलं निलेश राणेंचे कौतुक
20
कला केंद्राच्या प्रेमकथेचा भयावह शेवट; नर्तकीसमोरच पत्नीचा फोन आल्याने वाद, तरुणाने स्वतःला संपवले
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: नदी उशाला, कोरड घशाला; ऐन पावसाळ्यात पलूस शहरात पाण्याचा ठणठणाट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 18:32 IST

राष्ट्रवादी उपोषणाच्या पवित्र्यात 

पलूस : पलूस शहरात नदी आहे उशाला, कोरड मात्र घशाला, अशी अवस्था शहराची झाली आहे. शहरात गेल्या आठ दिवसांपासून नळ पाणीपुरवठा खंडित झाला आहे. कुंडल प्रादेशिक पाणीपुरवठा योेजनेचे वीजबिल थकीत असल्याने शहरात पाणीपुरवठ्याची ओरड आहे. आठ दिवसांपासून पलूसमधील नागरिकांना ऐन पावसाळ्यात पाण्यासाठी घागर घेऊन भटकंती करावी लागत आहे.शहराला टँकरने पाणीपुरवठा केला जातो. याला सर्वस्वी नगरपालिका प्रशासक जबाबदार आहेत. शहराला तत्काळ पाणी द्या, अन्यथा नगरपालिका प्रशासनाच्या विरोधात आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा जिल्हा राष्ट्रवादी उपाध्यक्ष सागर सुतार यांनी दिला आहे.नगरपालिका प्रशासनाने पलूस शहरातील नळकनेक्शनधारकांकडून मार्च महिन्यात सक्तीने वसुली केली. अनेकांची नळ कनेक्शन तोडली, डिजिटल बोर्डवरती नावे झळकवली. या मोहिमेत प्रामाणिक नळधारकांनी पाणीपट्टी भरून सहकार्यही केले. आज त्याच लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. मागील आठ दिवसांपासून शहराचा पाणीपुरवठा बंद आहे. शहरात नगरपालिकेच्या दोन टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.वर्षभरात नळ पाणीपुरवठयाची समस्या येरे माझ्या मागल्या आहे. शहरातील पाण्याची ओरड नेहमीच बनली आहे. आता नागरिकांचा संताप वाढला असून, जेवढे दिवस पाणी तेवढीच पाणीपट्टी घ्या, अशी मागणी होत आहे. नगरपालिका मालकीचे पाण्याचे एटीएम आहे. तेही अनेक महिन्यांपासून ठेकेदारास चालवायला देऊनही बंदच आहे. ते जरी चालू झाले तरी शहराला किमान पिण्याचे शुद्ध पाणी मिळाले.नगरपालिकेच्या मालकीच्या अनेक बोअरवेल सध्या गंजून बंद पडल्या आहेत. नगरपालिका प्रशासन पाण्यासाठी होणारे हाल उघड्या डोळ्यांनी पाहत आहे. तत्काळ पाणीपुरवठा केला नाही तर राष्ट्रवादी उपोषण करणार असल्याचे निवेदन पालिकेच्या अधिकाऱ्यांना आज देण्यात आले आहे.

नगरपालिकेने वीजबिलाची तरतूद लवकर करावी, नगरपालिकेकडे तीन टँकर असताना दोनच टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. खासगी टँकरमालकांची मदत घेऊन जास्तीत जास्त टँकरने पाणीपुरवठा करायला हवा. - सागर सुतार, जिल्हा उपाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस 

कुंडल प्रादेशिक नळयोजनेची वीज कनेक्शन हे वीज कंपनीने तोडले आहे. पलूस नगरकपालिकेची असणारी ४ लाख रुपयांची वीजबिल बाकी भरली आहे. या योजनेवरील अन्य कोणाची बाकी थकीत असेल तर नगरपालिका काय करणार? - निर्मिला राशिनकर-यमगर, मुख्याधिकारी, नगरपालिका